(लोहारा) : Lohara Pawanchakki Company Dadagiri : लोहारा तालुक्यातील मोघा बुद्रुक शेतकरी पवनचक्की कंपन्यांच्या अन्यायकारक कारभारामुळे संतप्त झाले आहेत. टाटा पॉवर रिन्यूअल एनर्जी लिमिटेड व सुयोग पवन ऊर्जा कंपनीने शेतकऱ्यांच्या रस्त्यावर अनधिकृतरीत्या बदल केल्याने शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले. यावर सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या पुढाकाराने तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर यांनी तत्काळ पंचनाम्याचे आदेश देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
शेतकऱ्यांचे नुकसान

या उंचीमुळे अलीकडील अतिवृष्टीचे पाणी शेतात शिरले व शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. एवढेच नाही तर कंपनीने उलट शेतकऱ्यांवरच तक्रारी दाखल करून महसूल विभागाकडून नोटिसा काढल्या. त्यामुळे शेतकरी मानसिक त्रासाला सामोरे जात होते.
अनिल जगतापांचा पुढाकार
शेतकऱ्यांची व्यथा लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसीलदार रणजीतसिंह कोळेकर यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले व नुकसानभरपाई मिळेल, अशी ग्वाही दिली.
शेतकऱ्यांना दिलासा
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनी अनिल जगताप व तहसीलदारांचे आभार मानले.

शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या
या निवेदनावर खालील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत –
अमोल गाडेकर, ज्ञानेश्वर गाडेकर, सतीश गाडेकर, गणपती जाधव, शिवाजी जाधव, सीताराम सूर्यवंशी, सुभाष जाधव, कोंडीबा सूर्यवंशी अनिल जाधव, वैभव गाडेकर, अनिल गाडेकर