Parvati Multiservices Scam : पार्वती मल्टीस्टेट खातेदारांचे रास्ता रोको आंदोलन रद्द – उच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

(लोहारा) : Parvati Multiservices Scam : पार्वती मल्टीस्टेट सहकारी बँकेविरोधात उमरगा, लोहारा तालुका तसेच पुणे येथील हजारो खातेदारांनी उभारलेला आवाज आता न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे २५ ऑगस्ट रोजी आष्टामोड येथे होणारे रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल दादा जगताप यांनी दिली.

पार्वती मल्टीस्टेटची फसवणूक – खातेदारांचा आरोप

खातेदारांच्या म्हणण्यानुसार, पार्वती मल्टीस्टेटने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. एफडी व पिग्मी योजना पूर्ण झाल्यानंतरही रक्कम परत करण्यास व्यवस्थापन टाळाटाळ करत आहे. एवढेच नाही तर अनेकांना अरेरावीची भाषा ऐकावी लागत असल्याचा आरोपही खातेदारांनी केला आहे.

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

या अन्यायाविरोधात ७ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी खातेदारांनी शासनाला निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रक्रियेला सुरुवात केली असली तरी समाधानकारक तोडगा निघाला नसल्यामुळे खातेदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्

प्रकरण न्यायप्रविष्ठ झाल्याने आता सर्वांची नजर न्यायालयाच्या निर्णयाकडे लागली आहे. खातेदारांना लवकरच न्याय मिळेल, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी व्यक्त केली.

रास्ता रोको आंदोलन रद्

याच कारणास्तव २५ ऑगस्ट रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले असून सर्व खातेदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.