Lohara Ativrushti 2025 : खरीप 2025 मध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या लोहारा तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाचा लोकप्रतिनिधी कडून पाहणी दौरा.

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

(लोहारा) : Lohara Ativrushti 2025 : चालू खरीप हंगामामध्ये लोहारा तालुक्यात 585 मिलिमीटर पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या 108% इतका आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यापूर्वीच शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने तहसीलदारांना निवेदन देऊन पंचनामेची तीव्रता निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार तातडीने चक्र घालून उपविभागीय अधिकारी यांनी पंचनामेचे आदेश दिले होते.
आज जिल्ह्याचे खासदार श्री. ओमराजे निंबाळकर, लोहारा – उमरगाचे आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी नेते अनिल जगताप, शिवसेना लोहारा तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार तसेच मार्डी गावातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व लोहारा उमरगा तालुक्यातील कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळेस खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना करून लोहारा तालुक्यातील एकही महसूल मंडळ अतिवृष्टी मदतीपासून वंचित राहणार नाही याची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिले.

Lohara Ativrushti 2025

सदरील पाहणी दौऱ्याच्या वेळेस तहसीलदार श्री. रणजीत सिंह कोळेकर, गटविकास अधिकारी श्री. जगदेव वगे, तालुका कृषी अधिकारी महेश देवकते, लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कोकलारे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मार्डी गावच्या पाहणी दौऱ्यानंतर सर्वांनी एकोंडी, राजेगाव या गावातील एक परिस्थितीचा आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आशा निर्माण झाली आहे.