(लोहारा) : Terna Dam : निम्न तेरणा प्रकल्प मागणी हे धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले असून ते धरण म्हणजे लोहारा औसा उमरगा या तीन तालुक्याचे भाग्यलक्ष्मी समजली जाते
निम्न प्रेरणा प्रकल्प मागणीची पाणी क्षमता 121 दशलक्ष घनमीटर असून सध्या विधरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. निम्नतीरणा प्रकल्प मागणी च्या पाण्याचा उपयोग लोहारा उमरगा औसा निलंगा धाराशिव या तालुक्यातील शेतकऱ्यांना होतो.
या धरणावर धाराशिव शहरापर्यंत पाणीपुरवठा करणारी आशिव उपसा सिंचन योजना असून दोन प्रवाही कालव्याद्वारे उजव्या व डाव्या निलंगा उमरगा तालुक्यातील गावांना , शेतीला पाणीपुरवठा केला जातो. याच धरणावरती निलंगा उमरगा लोहारा या शहराच्या पाणीपुरवठा योजना असून, लोहारा उमरगा तालुक्यातील खेडेगावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो तसेच लोहारा उमरगा औसा या तालुक्यातील शेतकरी बांधव मोटारीद्वारे पाणी उपसा करतात. त्यामुळे निम्न प्रेरणा प्रकल्प मागणी धरणावर अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

याच धरणावरती अवलंबून असलेल्या पाण्यावर शेतकरी प्रचंड प्रमाणात ऊस घेतात त्यामुळे भाऊसाहेब बिराजदार असेल विठ्ठल साई असेल बेलकुंड चा संत शिरोमणी असेल तसेच अनेक गुळ पावडर असेल अर्थकारण चालते त्यामुळे धरण पाण्याने भरणे अत्यंत महत्त्वाचे असते.
धरणाची निर्मिती झाल्यापासून आत्तापर्यंत 13 वेळेस धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे याही वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
आज विधिवत धरणाच्या पाण्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.