पुणे : Maharashtra Politics 2024 | महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील आडनावाचे आमदार हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. गावगाड्यापासून ते राज्याच्या सत्तेपर्यंत पाटील मंडळींचा दबदबा दिसून येतो. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ही परंपरा कायम राहिली असून, पाटील आडनावाचे आमदार विशीच्या वर गेले आहेत.
पाटील आणि राजकारण :
- ऐतिहासिक काळात पाटील हे गावगाड्याचे नेते मानले जात.
- सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात पाटील आडनावाने नेहमी आघाडी घेतली.
- आधुनिक महाराष्ट्रातही विधानसभेत पाटील आडनावाची मोठी ताकद दिसते.
2024 विधानसभा निवडणुकीत पाटील आमदारांचा दबदबा
2024 च्या निवडणुकीत पाटील आडनावाच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणात विजय मिळवला. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राजकीय पक्षात पाटील आडनावाचे आमदार आहेत.
पक्षनिहाय पाटील आडनावाचे आमदार
सर्वच रप्रमुख राजकीय पक्षांच्या आमदारांच्या बैठकीत पाटील मंडळी आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.पक्षनिहाय पाटील आडनावाचे आमदार खालील प्रमाणे-
भारतीय जनता पार्टी (BJP) – 5 आमदार
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
राघवेंद्र (रामदादा) पाटील | धुळे ग्रामीण |
रवीशेठ पाटील | पेन |
चंद्रकांत पाटील | कोथरुड |
संभाजी पाटील निलंगेकर | निलंगा |
राणाजगजीतसिंह पाटील | तुळजापूर |
शिवसेना (शिंदे गट) – 5 आमदार
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
अमोल पाटील | येरडोल |
किशोर पाटील | पाचोरा |
चंद्रकांत निम्बा पाटील | मुक्ताईनगर |
अशोक पाटील | रामटेक |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) – 5 आमदार
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
अनिल पाटील | अमळनेर |
प्रतापराव पाटील चिखलीकर | लोहा |
दिलीप वळसे पाटील | आंबेगाव |
बाबासाहेब पाटील | अहमदपूर |
सचिन पाटील | फलटण |
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 2 आमदार
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
डॉ. राहुल पाटील | परभणी |
कैलास पाटील | धाराशिव-कळंब |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) – 4 आमदार
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
नारायण पाटील | करमाळा |
अभिजीत पाटील | माढा |
जयंत पाटील | इस्लामपूर |
रोहित पाटील | कवठेमहाकाळ |
इतर पक्ष – 2 आमदार
आमदाराचे नाव | मतदारसंघ |
शिवाजी पाटील | चंदगड |
राजेंद्र पाटील | शिरोळ |
एकूण संख्याशास्त्र
- BJP – 5 आमदार
- शिवसेना (शिंदे गट) – 5 आमदार
- NCP (अजित पवार गट) – 5 आमदार
- शिवसेना (उद्धव गट) – 2 आमदार
- NCP (शरद पवार गट) – 4 आमदार
- इतर – 2 आमदार
महाराष्ट्राच्या राजकारणावर मजबूत पकड!
2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाटील आडनावाने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. सर्वच प्रमुख पक्षांमध्ये पाटील आडनावाचे आमदार असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील घराण्यांची मजबूत पकड कायम असल्याचे स्पष्ट होते.