(धाराशिव) : Dharashiv Krushana Marathvada SinchanYojana : केल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली. तुळजापूर लोहारा उमरगा तालुक्यातील पाणी वितरणात येणार सुलभता.

तुळजापूर लोहारा उमरगा तालुक्यासाठी सहावा टप्पा अत्यंत महत्त्वपूर्ण असा होता. पाणी येऊनही त्याचे वितरण केवळ सहाव्या टप्प्यातूनच होणार असल्याने त्याला विशेष असे महत्त्व होते मात्र आत्तापर्यंत त्याचा साधा प्राधान्य क्रमामध्ये देखील समावेश नव्हता. यासंदर्भात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे शेतकरी नेते अनिल जगताप यांनी पाठपुरावा केला होता आज त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून पाटबंधारे विभागाने सहाव्या टप्प्याचा प्राधान्य क्रमात समावेश केल्याने आता इथून पुढील प्रक्रिया पार पडेल अशी आशा तुळजापूर उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.

23 ऑगस्ट 2007 रोजी महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली त्यावेळेस प्रकल्पाचा खर्च 2382 कोटी इतका होता. त्यानंतर 27 ऑगस्ट 2009 रोजी प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली त्यावेळी प्रकल्प खर्च 4210 कोटी 59 लाख रुपये इतका होता त्यानंतर द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता 10 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसाद नार्वेकर उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली आत्ता प्रकल्पाचा खर्च 11726 कोटी 91 लाख इथपर्यंत जाऊन ठेपला आहे आत्तापर्यंत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे केवळ पाच टक्क्याचे काम सुरू आहे.

मात्र यातील सहावा टप्पा जो तुळजापूर लोहारा उमरगा तालुक्याला पाणी वितरण करणार आहे त्याचा साधा प्राधान्यक्रमात देखील समावेश नव्हता तो समावेश करावा व पुढील प्रक्रिया वेगाने पार पाडावी अशी विनंती वारंवार जलसंपदा मंत्री यांच्याकडे शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केली होती आज अखेर यश आले असून पाटबंधारे विभागाच्या प्राधान्यक्रमात सहाव्या टप्प्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

प्राधान्यक्रमात समावेश म्हणजे काय…
पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध असलेल्या दरवर्षीच्या आर्थिक बजेट मधून महाराष्ट्रातील कुठली कुठली कामे करायची याचे नियोजन केलं जातं आणि त्याचा प्राधान्यक्रम ठरवला जातो त्याला प्राधान्य क्रमात घेणे असे म्हणतात. एखादा प्रकल्प प्राधान्यक्रमात आल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता दिली जाते टेंडर प्रक्रिया होते आणि नंतर मग कामाला सुरुवात होते त्यामुळे प्रथम प्राधान्यक्रमात तो प्रकल्प येणं महत्त्वाचं असतं तो टप्पा आज पार पडलेला आहे.

2004 चारला प्रकल्प सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत 2025 अर्थात 21 वर्षात पाचच टप्प्याचे काम पूर्ण आहे सहाव्या टप्प्याचा प्राधान्य क्रमात देखील समावेश नव्हता त्यासाठी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी वारंवार प्रयत्न केले.
शेतकरी नेते अनिल जगताप यांची प्रतिक्रिया…

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने आज कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्याला प्राधान्य क्रमात स्थान दिले असून त्याचा मनातून आनंद झाला आहे जलसंपदा मंत्री श्री विखे पाटील यांच्याकडे या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला होता इथून पुढे प्रशासकीय मान्यता टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन तुळजापूर उमरगा लोहारा तालुक्यात पाणी वितरणात सुलभता यावी व काम वेगाने पूर्ण व्हावे हीच अपेक्षा.