धाराशिव : Dharashiv Ativrushti Anudan / केवळ चमकोगिरी नसावी अनिल जगताप यांचे प्रतिपादन.गेल्या तीन वर्षातील अतिवृष्टी सततच्या पावसाच्या मदती संदर्भातील प्रसिद्धी पत्रकार द्वारे माहिती.
मे महिन्यात सुरू झालेला पाऊस काही थांबायचं नाव घेत नसून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे, पीक नुकसानीमुळे शेतकऱ्याची कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले असून, अनेक जणांच्या जमिनी खरवडून गेल्या जनावरे वाहून गेली असून काही ठिकाणी जीवित हानी ही झाली आहे. अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार असतो तो शासकीय मदतीचा गेल्या तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती मदत झाली याविषयी काही धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अतिवृष्टीने शेती पिकाचे नुकसान झाले की अनेक जण अतिवृष्टीचा ग्रस्त भागाचा दौरा करतात शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देतात मात्र त्याच्यात शेतकऱ्यांना की मदत किती मिळते हा एक संशोधनाचा विषय आहे. चमकोगिरी पासून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मदत मिळते हे मात्र या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शासनाला अहवाल पाठवला आहे लवकरच मदत मिळेल अशा अधून मधून घोषणा होतात मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडते याचं शेतकऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणारी ही आकडेवारी आहे.

सन 2022 मध्ये अतिवृष्टी पुरामुळे शेती पिकाचे नुकसान व मिळालेली मदत.
तालुका | शेतकरी संख्या | मदत रक्कम |
धाराशिव | 74,824 | 81 कोटी 3 लाख |
तुळजापूर | 95,102 | 94 कोटी 13 लाख |
उमरगा | 56,522 | 69 कोटी 33 लाख |
लोहारा | 30,697 | 34 कोटी 45 लाख |
भूम | 5,926 | 4 कोटी 26 लाख |
परंडा | 2,984 | 1 कोटी 73 लाख |
कळम | 45,222 | 54 कोटी 2 लाख |
वाशी | 410 | 32 लाख 23 हजार |
धाराशिव 74824 शेतकऱ्यांना 81 कोटी तीन लाख रुपये, तुळजापूर 95 हजार 102 शेतकऱ्यांना 94 कोटी 13 लाख रुपये ,उमरगा 56 हजार 522 शेतकऱ्यांना 69 कोटी 33 लाख रुपये, लोहारा तीस हजार 697 शेतकऱ्यांना 34 कोटी 45 लाख रुपये ,भूम 5926 शेतकऱ्यांना चार कोटी 26 लाख रुपये ,परंडा 2984 शेतकऱ्यांना एक कोटी 73 लाख रुपये, कळम 45 हजार 222 शेतकऱ्यांना 54 कोटी दोन लाख रुपये वाशी 410 शेतकऱ्यांना 32 लाख 23 हजार रुपये.
सन 2023 मध्ये अतिवृष्टी सततच्या पावसामुळे शेती पिकाचे झालेले नुकसान व मिळालेली मदत पुढीलप्रमाणे..
तालुका | शेतकरी संख्या | मदत रक्कम |
धाराशिव | 92,129 | 118 कोटी 67 लाख |
लोहारा | 34,197 | 46 कोटी 1 लाख |
वाशी | 37,933 | 43 कोटी 81 लाख |
धाराशिव तालुक्यातील 92 हजार 129 शेतकऱ्यांना 118 कोटी 67 लाख रुपये, लोहारा तालुक्यातील 34 हजार 197 शेतकऱ्यांना 46 कोटी एक लाख रुपये ,वाशी तालुक्यातील 37 हजार 933 शेतकऱ्यांना 43 कोटी 81 लाख.
सन 2024 मध्ये अतिवृष्टी सततच्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील झालेल्या शेती पिकाचे नुकसान व मिळालेली नुकसान भरपाई पुढील प्रमाणे.
तालुका | शेतकरी संख्या | मदत रक्कम |
धाराशिव | 65,813 | 98 कोटी 47 लाख |
कळम | 65,369 | 73 कोटी 75 लाख |
परंडा | 14,395 | 9 कोटी 74 लाख |
वाशी | 95,057 | 40 कोटी 3 लाख |
उमरगा | 49,635 | 52 कोटी 75 लाख |
लोहारा | 30,634 | 33 कोटी 70 लाख |
धाराशिव 65 हजार 813 शेतकरी 98 कोटी 47 लाख रुपये, कळम तालुक्यातील 65369 शेतकऱ्यांना 73 कोटी 75 लाख रुपये ,परंडा तालुक्यातील 14,395 शेतकऱ्यांना नऊ कोटी 74 लाख रुपये, वाशी 95 हजार 57 शेतकऱ्यांना 40 कोटी तीन लाख रुपये, उमरगा 49 हजार 635 शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाख रुपये ,लोहारा तीस हजार 634 शेतकऱ्यांना 33 कोटी 70 लाख रुपये अतिवृष्टीची मदत मिळालेली आहे.
मार्च, मे 2025 मध्ये अवेळी पाऊस वादळी वारा व गारपिट यामुळे झालेल्या फळ पिकाचे नुकसान व त्यांना मिळालेली मदत पुढील प्रमाणे आहे.
तालुका | शेतकरी संख्या | मदत रक्कम |
धाराशिव | 1,682 | 1 कोटी 59 लाख |
तुळजापूर | 2,960 | 1 कोटी 90 लाख |
उमरगा | 418 | 41 लाख 13 हजार |
लोहारा | 402 | 30 लाख 23 हजार |
भूम | 11,387 | 98 लाख 97 हजार |
परंडा | 1,276 | 1 कोटी 21 लाख |
कळम | 961 | 85 लाख 30 हजार |
वाशी | 1,760 | 1 कोटी 10 लाख |
धाराशिव तालुक्यातील 1682 शेतकऱ्यांना एक कोटी 59 लाख रुपये तुळजापूर तालुक्यातील 2960 शेतकऱ्यांना एक कोटी 90 लाख रुपये उमरगा तालुक्यातील 418 शेतकऱ्यांना 41 लाख 13 हजार रुपये लोहारा तालुक्यातील 402 शेतकऱ्यांना 30 लाख 23 हजार रुपये भूम तालुक्यातील 1 1387 शेतकऱ्यांना 98 लाख 97 हजार रुपये परंडा तालुक्यातील १२७६ शेतकऱ्यांना एक कोटी एकवीस लाख रुपये कळम तालुक्यातील 961 शेतकऱ्यांना 85 लाख 30 हजार रुपये वाशी तालुक्यातील 1760 शेतकऱ्यांना एक कोटी दहा लाख याप्रमाणे एकूण आठ कोटी 37 लाख रुपये ची पिक नुकसान भरपाई जाहीर झालेली असून अद्याप वितरण होणे बाकी आहे.
क्षेत्रफळ व शेतकरी संख्या पाहता गेल्या सतत तीन वर्षात धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक. 29 जुलै रोजी शासन निर्णय काढून उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने मदत जाहीर केली आहे वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात ते वितरण होणार आहे. अतिवृष्टीची मदत मिळाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
तर तुळजापूर तालुक्याला गेल्या दोन वर्षात अतिवृष्टी व सततचा पाऊस याची मदत मिळाली नसल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

चालू चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टी सततच्या पावसाच्या पीक नुकसान भरपाईचा पहिला प्रस्ताव पाठवल्याचे शासनातर्फे कालच सांगण्यात आले असून जिल्ह्याचे जवळपास 500 कोटी रुपयांचे यावर्षी नुकसान झाले आहे. वेळेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून आर्थिक दिलासा मिळावा एवढीच माफक अपेक्षा असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.