धाराशिव : Ativrushti Madat 2025 : चालू वर्षीच्या पीक नुकसान भरपाई साठी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 34 हजार 955 शेतकऱ्यांना 189 कोटी 60 लाख 67 हजार रुपयाची अतिवृष्टीची मदत जाहीर शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती.
चालू वर्षी धाराशिव जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असून पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली असून पडणारा पाऊस आता शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे 24 मे पासून सुरू झालेला पाऊस थांबायचं नाव घेत नाही.

अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले होते जमिनी खरवडून गेल्या होत्या पशुधन वाहून गेले होते अशा परिस्थितीमध्ये शेतकरी राज्य शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसला होता जिल्हा प्रशासनाचे पहिल्या टप्प्यातील प्रस्ताव तयार करून 15 ऑगस्ट रोजी राज्य शासनाकडे पाठवला होता त्याला
आज अंतिम स्वरूप देण्यात आले असून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील 2,3495 शेतकऱ्यांना 189 कोटी 60 लाख 67 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे मदतीची दोन हेक्टर ची मर्यादा असून प्रती हेक्टर 8500 नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
तालुका-निहाय मदतीचे वाटप मदत पुढीलप्रमाणे.
तालुका | लाभार्थी शेतकरी संख्या | जाहीर मदत रक्कम (रु.) |
धाराशिव | 43,065 | 39,55,12,000 |
तुळजापूर | 24,110 | 22,69,87,000 |
उमरगा | 502 | 13,32,000 |
लोहारा | 23,259 | 21,86,03,000 |
भूम | 43,276 | 28,31,15,000 |
परंडा | 1,294 | 52,16,000 |
कळम | 61,874 | 50,88,86,000 |
वाशी | 37,575 | 25,64,12,000 |
एकूण | 2,34,955 | 1,89,60,67,000 |
धाराशिव तालुक्यासाठी त्रेचाळीस हजार 65 शेतकऱ्यांना 39 कोटी 55 लाख 12 हजार रुपये मिळणार आहेत तर तुळजापूर तालुक्यातील 24 हजार 110 शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना 22 कोटी 69 लाख 87 हजार रुपये मिळणार आहेत उमरगा तालुक्यातील 502 शेतकऱ्यांना 13 लाख 32 हजार रुपये मिळणार आहे लोहारा तालुक्यातील 23259 शेतकऱ्यांना 21 कोटी 86 ला तीन हजार रुपये मिळणार आहेत भूम तालुक्यातील 43276 शेतकऱ्यांना 28 कोटी 31 लाख 15 हजार रुपये मिळणार आहेत.

परंडा तालुक्यातील 1294 शेतकऱ्यांना 52 लाख 16 हजार रुपये मिळणार आहेत कळम तालुक्यातील 618 74 शेतकऱ्यांना 50 कोटी 88 लाख 86 हजार रुपये मिळणार आहेत वाशी तालुक्यातील ३७५७५ शेतकऱ्यांना 25 कोटी 64 लाख 12 हजार रुपये मिळणार आहेत राज्य शासनाने पहिल्या टप्प्यातील जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी देऊन आज मदत जाहीर केली आहे.

दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तोही राज्य शासनाला पाठवून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सांगितले.