अखेर लोहारा-उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टीचे अनुदान! आंदोलन रद्द |Ativrushti Madat Lohara Umarga

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Ativrushti Madat Lohara Umarga : अतिवृष्टी 2024 ची मदत लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने सहा ऑक्टोबर रोजी होणारे लोहारा तालुका तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन रद्द शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती.

लोहारा उमरगा तालुक्यात गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली मात्र पहिल्या टप्प्यात लोहारा उमरगा तालुक्याचा समावेश अतिवृष्टीच्या अनुदानात नव्हता शेतकरी नेते आणि जगताप यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार लोहारा उमरगा तालुक्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला 15 ऑक्टोबर रोजी पाठवला गेला.

त्यानंतर तो विभागीय आयुक्त कडे गेला मात्र विभागीय आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात प्रस्ताव न गेल्याने गेली वर्षभर ही मदत रखडून होती. अखेर राज्य शासनाने 29 जुलै रोजी शासन निर्णय काढून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली.

मध्ये जाहीर होऊन दोन महिने झाले होते मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान पडत नव्हते त्यामुळे सहा ऑक्टोबर रोजी लोहारा तहसील कार्यालयाकडे आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासन अलर्ट मोड वरती आले तातडीने याद्या तयार केल्या गेल्या.

Ativrushti Madat Lohara Umarga

मंत्रालयात पाठवून विके नंबर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले केवायसी ची प्रक्रिया पार पाडलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती रकमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आपली मागणी मान्य झाल्याने व
त्यामुळे सहा ऑक्टोबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर होणारे धरणे आंदोलन रद्द करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली