लोहारा : Tehsildar Ranjitsing Kolekar : अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना नागरिकांना धीर देणारे लोहार याची तहसीलदार श्री रणजीत सिंह कोळेकर यांचा शेतकरी बांधवांनी केला सत्कार.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यात 17 मे पासून सुरू झालेल्या पावसाने धुडगूस घातला असून एकूण सरासरीच्या 165 टक्के इतका पाऊस झालेला आहे या अतिवृष्टीच्या तडाख्याने लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. अशा नैसर्गिक आपत्तीत धीर देणाऱ्या तालुका प्रमुखाची गरज असते आणि तीच भूमिका श्री रणजीत सिंह कोळेकर यांनी सक्षमपनाने बजावल्याने तालुक्यातील नागरिकांनी तहसीलदार श्री रणजीत सिंह कोळेकर यांचा सत्कार केल्याचे एक अनोखा उदाहरण समोर आलेल आहे.

श्री रणजीत सिंह कोळेकर यांना नैसर्गिक आपत्तीत केवळ नागरिकांना धीरज द्यायचा नव्हता तर लोहारा उमरगा तालुक्यात गेल्यावर्षीचे मंजूर झालेले 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करायचे होते त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांच्या नुकसानीचा अहवाल मागून घेऊन केवायसी साठी या ज्या मंत्रालयात पाठवून मंजूर करून घेणे केवायसी करून घेणे मदत वाटप करणे खूप मोठी जबाबदारी होती मात्र ती त्यांनी अतिशय सक्षमपनाने पार पाडलेली आहे .
तसेच चालू वर्षी नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचा प्रशासनाला वेळेत अहवाल देणे बंधनकारक होते त्यांच्या कार्य तत्परतेमुळे लोहारा तालुक्यातील 23 हजार 699 शेतकऱ्याचा ऑगस्ट मधला अहवाल गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की 23 सप्टेंबर रोजी जे राज्य शासनाने मदत जाहीर केली त्यात लोहारा तालुक्यातील शेतकरी बांधवांना जवळपास 23 कोटी दहा लाख रुपयांचे वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अतिवृष्टीची 2024 ची मदतही पडत आहे. लोहारा तालुक्यातील 33 हजार 607 शेतकऱ्यांना अतिवृष्टी 2025 ची 85 कोटी रुपये मदत मिळणार आहे .

तालुक्यावरच्या प्रमुख अधिकाऱ्यांना जर मनात आणलं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना धीर देता येतो शासकीय मदत मिळवून देता येते याचे एक उत्तम उदाहरण श्री रणजीत सिंह कोळेकर यांनी घालून दिलेले आहे.
तहसीलदार श्री रणजीत सिंह कोळेकर यांनी शेतकऱ्याप्रती, समाजातील नागरिकाप्रति दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे तालुक्यातील शेतकरी नेते अनिल जगताप , शिरीष मुसांडे मुसांडे ,केशव पाटील ,एडवोकेट दादासाहेब जानकर ,भानुदास चव्हाण, श्री नितीन वळके ,मिलिंद नागवंशी इत्यादी शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.





