लोहारा : Lohara crop cutting experiment 2025 | लोहारा महसूल मंडळातील शेवटचा अर्थात बारावा पीक कापणी प्रयोग भातागळी तालुका लोहारा येथे आज संपन्न झाला. प्रयोगातून 605 ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन निघाले. उत्पादन घटल्याने मोठी पीक नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता..
चालू वर्षी शासनाने नवीन विमा योजना आणली असून कापणी प्रयोगाद्वारे 50 टक्के व उपग्रह आधारित छायाचित्राद्वारे 50 टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे.

एका महसूल मंडळात 12 पीक कापणी प्रयोग करण्यात येत आहेत महसूल मंडळातील एकाच गावात दोन प्रयोग केले जातात त्यानुसार यापूर्वीच भातागळी गावामध्ये पहिल्या पीक कापणी प्रयोगात 235 ग्रॅम इतके सोयाबीन निघाले होते तर आज दुसरा पीक कापणी प्रयोग करण्यात आला त्यात 605 ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन निघाले. अतिशय कमी उत्पादन निघाले असल्याने लोहारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना कदाचित पीक कापणी प्रयोगा आधारे मोठी पीक नुकसान भरपाई मिळू शकते.
पीक कापणी प्रयोगाच्या वेळेस शेतकरी नेते अनिल दादा जगताप, कृषी सहाय्यक जाधव मॅडम, भातागळी गावच्या पोलीस पाटील मनीषा पाटील, गावचे सरपंच हनुमंत जगताप, विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब जगताप, ग्रामपंचायत सदस्य तानाजी आनंदगावकर , अमोल ओवांडकर , गणेश फत्तेपुरे, समाधान पाटील ,विजय वाले ,रवी कुमार जगताप ,प्रशांत कुलकर्णी , अविनाश जगताप ,तानाजी फत्तेपुरे ,अनिकेत जगताप,सौमित्र जगताप पिक विमा कंपनीचे कर्मचारी श्री बागल ,श्री शेख उपस्थित होते.




