लोहारा : Lohara farmer protest : उमरगा लोहारा तालुक्यातील रखडलेल्या 45 हजार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान 2024 साठी लोहारा तहसील कार्यालयासमोर सात नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती.

गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उमरगा लोहारा तालुक्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला शेतकरी नेते आणि जगताप यांनी पुढाकार घेऊन धरणे आंदोलन रस्ता रोको यासारख्या मार्गाचा अवलंब केल्यानंतर एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर राज्य शासनाने सहा ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय काढून लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये चे अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले होते.
त्यात उमरगा तालुक्यातील 49 हजार 228 शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाख रुपये तर लोहारा तालुक्यातील 30 हजार 652 शेतकऱ्यांना 33 कोटी 70 लाख रुपये मंजूर केले होते. शासन निर्णय निघून तीन महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप पर्यंत उमरगा लोहारा तालुक्यातील 44 हजार शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत.
आत्तापर्यंत उमरगा तालुक्यातील 20743 शेतकऱ्यांना 22 कोटी 50 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून लोहारा तालुक्यातील 16 हजार 227 सत्तावीस शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 18 कोटी 49 लाख रुपये चे वाटप केले गेले आहे.
मात्र अद्यापही उमरगा तालुक्यातील 29 हजार व लोहारा तालुक्यातील 14 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान वाटप होणे बाकी आहे. एकूण अंदाजे 44 हजार शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित आहेत शासनाकडे वारंवार विचारणा करून विनंती करून काहीही उपयोग होत नाही त्यामुळे सात नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी उमरगा ,तहसीलदार लोहारा ,पोलीस स्टेशन लोहारा यांना रीतसर निवेदन देण्यात आले आहे.

एक ऑक्टोबर पासून राज्य शासनाने केवायसी पोर्टल बंद केल्याने लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मनात 2024 च्या अतिवृष्टी अनुदानासंदर्भात चलविचल सुरू झाली आहे तसेच प्रशासनातील व राज्य शासनातील कोणीही याबाबत स्पष्टता आणत नाही त्यामुळे सात नोव्हेंबरला अकरा वाजता लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.
अनुदानापासून वंचित असलेल्या उमरगा लोहारा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती देखील त्यांच्यामार्फत करण्यात आली आहे.




