79 हजार शेतकऱ्यांना मंजूर पण 44 हजारांना अद्याप पैसे नाही — शासनाच्या विलंबावर शेतकरी संतप्त | Lohara Umarga farmers grant

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Lohara Umarga farmers grant : लोहारा उमरगा तालुक्यातील प्रलंबित44 हजार शेतकऱ्याचे अतिवृष्टी अनुदान 16 नोव्हेंबर पर्यंत खात्यावर जमा नाही केल्यास 17 नोव्हेंबर रोजी आष्टामोड ता.लोहारा येथे राष्ट्रीय महामार्ग अडवणार आमदार प्रवीण स्वामी व शेतकरी नेते अनिल जगताप यांची लोहारा येथील धरणे आंदोलनात घोषणा.

Lohara Umarga farmers grant

अतिवृष्टी अनुदान 2024 हे लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मंजूर झाले असून 6 ऑगस्ट 2025 रोजी शासन निर्णय निघून देखील अद्याप पर्यंत 44 हजार शेतकऱ्यांचे रक्कम खात्यावर पडणे प्रलंबित असल्याने आज आमदार प्रवीण स्वामी शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले

तसेच शेतकऱ्याच्या खात्यावर 16 नोव्हेंबर रक्कम जमा नाही झाल्यास १७ नोव्हेंबर रोजी आष्टा मोड तालुका लोहारा येथील राष्ट्रीय महामार्ग अडवणार असल्याची घोषणा आमदार श्री प्रवीण स्वामी व अनिल जगताप यांनी केली.

Lohara Umarga farmers grant

एक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने लोहारा उमरगा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये मंजूर केले होते मात्र अद्याप पर्यंत शासन निर्णय निघून तीन महिने झाल्यावरही लोहारा उमरगा तालुक्यातील जवळपास 44 हजार शेतकऱ्यांचे पैसे मिळणे बाकी आहे राज्य शासनाने एक ऑक्टोबर पासून केवायसी पोर्टल बंद केल्याने केवायसी करायची की ॲग्री स्टिक द्वारे पैसे पडतील यात कुठेही स्पष्टता नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

प्रशासन व राज्य शासनाकडे विनंती करून देखील रक्कम पडत नसल्याने आज लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन अनिल जगताप यांनी धरणे आंदोलन केली त्याला उमरगा लोहारा तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांनी पाठिंबा देऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Lohara Umarga farmers grant

श्री अनिल जगताप हे नेहमीच शेतकऱ्याचे बाजू घेऊन लढतात केवळ त्यांच्याच प्रयत्नाने लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये मंजूर झाले आहेत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडावेत यासाठी देखील ते प्रयत्न करत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करून त्यांचे कौतुक होत आहे.

या धरणे आंदोलनासाठी लोहारा उमरग्याचे लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी सर ,शेतकरी नेते अनिल दादा जगताप ,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष अमोल बिराजदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सवार साहेब, स्वराज पक्षाचे प्रमुख महेश गोरे, संभाजी ब्रिगेडचे बालाजी यादव, शिवसेनेचे शहराध्यक्ष सलीम शेख, महबूब गवंडी, संजय लोभे, सुजित मुळे, गणेश फत्तेपुरे, राहुल निम्बर्गी, सोमनाथ भोंडवे ,निशिकांत गोरे, महेश लोभे व गावागावातून आलेले शेतकरी उपस्थित होते.