7 नोव्हेंबरच्या आंदोलनाचा परिणाम: सरकारने घेतली दखल, अनुदान वाटप सुरू |Farmers’ Protest Success

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Farmers’ Protest Success : सात नोव्हेंबर रोजी केलेल्या आंदोलनाने सरकारवर वटणीवर. केवायसी सह 24 व 25 चे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात झाल्याने 17 नोव्हेंबर चे आष्टा मोड तालुका लोहारा येथील रस्ता रोको आंदोलन रद्द शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती.

एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लोहारा उमरगा तालुक्याला अतिवृष्टी 2024 हे 6 ऑगस्ट 2025 ऑगस्ट रोजी अनुदान मंजूर झाले होते .उमरगा लोहारा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये मंजूर झाले होते. मात्र त्याचे वितरण अतिशय संत गतीने सुरू होते त्यातच राज्य शासनाने एक ऑक्टोबर पासून केवायसी चे पोर्टल बंद केल्याने शेतकरी हतबल झाला होता.

Farmers’ Protest Success

चालू वर्षी अर्थात 2025 ला अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याला फार मोठा फटका बसला होता त्याचेही दोन्ही तालुक्यातील अनुदान मंजूर झाले होते मात्र वितरण प्रक्रिया अतिशय संत गतीने सुरू होती त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. ही बाब लक्षात घेऊन शेतकरी नेते अनिल जगताप यांनी लोहारा तहसील कार्यालयासमोर सात नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करत सरकारला 16 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान टाकावे तसेच केवायसी पोर्टल सुरू करावे अन्यथा 17 नोव्हेंबरला आष्टा मोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

प्रशासनाने व राज्य शासनाने या इशाऱ्याची गंभीर दखल घेत काल 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ई-केवायसी पोर्टल सुरू केले असून बारा नोव्हेंबर पासूनच लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्याच्या खात्यावरती अतिवृष्टी अनुदान 24 व 25 पडायला सुरुवात झाली आहे.


सात नोव्हेंबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता तसेच लोहारा उमरगा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री प्रवीण स्वामी सर यांनी देखील पाठिंबा देऊन 17 नोव्हेंबरच्या अष्टा मोड येथील रस्ता रोको आंदोलनात स्वतः सहभागी होणार असल्याचा इशारा दिला होता ,तातडीने चक्र फिरून केवायसी पोर्टल सह अतिवृष्टी अनुदान 24 व 25 शेतकऱ्याच्या पडायला सुरुवात झाली आहे.

Farmers’ Protest Success

शेतकरी नेते आणि जगताप यांनी जरी लोहारा उमरगा तालुक्याच्या अतिवृष्टी अनुदान 24 25 व ही केवायसी संदर्भात सात नोव्हेंबर रोजी आंदोलन केले असले तरी त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला झाला असून ही केवायसी पोर्टल सुरू झाल्याने त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झाला असल्याने शेतकरी वर्गातून अनिल जगताप हे करत असलेल्या शेतकऱ्याच्या संघर्षाबद्दल प्रयत्न बद्दल कौतुक होत आहे. इ केवायसी पोर्टल सह 24 25 चे अनुदान खात्यावर पडायला सुरुवात झाल्याने 17 नोव्हेंबर रोजीचे असल्यामुळे येथील रस्ता रोको आंदोलन रद्द केल्याची माहिती श्री अनिल जगताप यांनी दिली आहे.