लोहारा : Agricultural Empowerment : पद्मविभूषण माजी कृषी मंत्री श्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याला सुरुवात शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती.

देशाचे माजी कृषी मंत्री श्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थात बारा डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात भातागळी तालुका लोहारा येथून शरद पवार साहेबांवर अजन्म प्रेम करणाऱ्या पाच शेतकरी बांधवांच्या हस्ते करून एक वेगळी प्रथा आणि परंपरा जोपासली असल्याचे माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.
सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून सन 2020 ते 2025 पर्यंतचा पिक विमा, अतिवृष्टी अनुदान ,कांदा अनुदान, प्रोत्साहन अनुदान ,दूध अनुदान शासनाकडचे इतर देणे तसेच शासकीय योजना विषयी येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी बांधवाकडून फॉर्म भरून घेण्यात येत असून शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या प्रश्नाची सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.

कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील आरणी, कानेगाव, भातागळी, काष्टी खुर्द, काष्टी बुद्रुक, नागूर ,लोहारा खुर्द, मोगा खुर्द ,मोगा बुद्रुक, शिवकर वाडी, बेलवाडी, नागराळ, बेंड काळ, उंडरगाव, मार्डी ,हिप्परगा रवा या गावात सुप्रिया शेतकरी संवाद दौरा होणार आहे.
भातागळी गावातील श्री बालाजी आनंदगावकर ,श्री चंद्रकांत पवार, श्री लक्ष्मण चव्हाण, श्री हनुमंत दादा जगताप, श्री दत्तात्रय मिसाळ, सरपंच हनुमंत भानुदास जगताप यांच्या हस्ते सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे उद्घाटन करण्यात आले. कुठल्याही राजकीय व्यक्तीला न बोलवता गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते या सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे उद्घाटन केल्याने तालुक्यात चर्चेचा विषय होता तसेच बळीराजाला सन्मान दिल्याबद्दल शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे.

सुप्रिया शेतकरी संवाद दौरा हा कार्यक्रम शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे भातागळी येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश जगताप ,शुभम जगतापअभिषेक जगताप, गणेश फत्तेपुरे ,वैभव जगताप ,गोविंद जगताप ,संकेत जगताप, मुकुंद चव्हाण ,महादेव आनंदगावकर, दयानंद मिसाळ, दादा चव्हाण इत्यादी शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले.

पुढील आठवड्यात कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावात सुप्रिया शेतकरी संवाद दौरा होणार असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या संवाद दौऱ्याचा समारोप लोहारा येथील जाहीर सभेने होणार असून त्या सभेसाठी संसद रत्न सुप्रियाताई सुळे अमोल कोल्हे यांना आमंत्रित करण्याचा मानस असल्याचे सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे संयोजक शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सांगितले.



