लोहारा : Supriya Shetkari Samvad Daura : सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याला उंडरगावातील शेतकऱ्याकडून प्रचंड प्रतिसाद..शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या पाठीमागे ताकतीने उभे रहा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांची शेतकऱ्यांना भावनिक साद.

शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या संकल्पनेतून कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील 16 गावांमध्ये सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन केले गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल उंडरगाव येथे सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याचे आयोजन केले होते.
त्यात जिल्हाध्यक्ष डॉक्टर पाटील म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून अनिल जगताप यांनी धाराशिव जिल्ह्यात नेहमीच प्रयत्न केले आहेत. गाव खेड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तांत्रिक बाबीची माहिती व्हावी यासाठी अनिल जगताप करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मतदारसंघातील शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहून त्यांना साथ द्यावी अशी भावनिक साद पाटील यांनी शेतकरी बांधवांना घातली.

सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्यात सन 2020 पासून 25 पर्यंत थकलेले शेतकरी बांधवांचे पीक विमा अतिवृष्टी अनुदान कांदा अनुदान प्रोत्साहन अनुदान दूध अनुदान तसेच शासकीय येणे या संदर्भात फॉर्म भरून घेतले जात असून भरलेले फॉर्म जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यात येत आहे.
अनिल जगताप यांनी 2020 ते 25 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा अतिवृष्टी यासाठी शासन दरबारी वेळप्रसंगी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे जाऊन न्याय मिळवून दिला असल्याने शेकडो कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले आहेत मात्र काही शेतकरी अनुदान मंजूर होऊनही त्यांच्या हक्काच्या रकमेपासून वंचित आहेत त्यासाठी फॉर्म भरून घेऊन त्यांच्यासाठी सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्यातून प्रयत्न केले जात आहेत.

उंडरगाव येथे झालेल्या सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील, वक्ता सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे, लोहारा तालुका राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष नरदेव कदम, उंडर गावच्या सरपंच सोनाली वाघमारे ,उपसरपंच हिराचंद मोरे, ग्रामपंचायत सदस्य भुमेश पवार विवेक सेवा सोसायटीचे चेअरमन युवराज तोडकरी ,सोसायटी सदस्य पवन सूर्यवंशी ,शेतकरी रंगनाथ जाधव, प्रदीप ढोबळे महेश घोडके गणेश सूर्यवंशी संजय सूर्यवंशी विश्वास ढोबळे बालाजी माने ज्ञानेश्वर ढोबळे अमित ढोबळे संजय माने वीट उत्पादक राजेंद्र सूर्यवंशी श्रीशैल्य साखरे शुभम साखरे अण्णा जगणे पंडित चव्हाण ज्ञानेश्वर सूर्यवंशी संजय माने संजय सूर्यवंशी बालाजी गाडे सुभाष गाडे सागर रवळे व समस्त गावकरी व न शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



