ॲडव्होकेट शितल चव्हाण फाउंडेशनची अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना मदतीची धाव | उमरगा-लोहारा | Advocate Sheetal Chavan Foundation Flood Relief

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

उमरगा : Advocate Sheetal Foundation Flood Relief : ॲडव्होकेट शितल चव्हाण फाउंडेशनच्या उमरगा वतीने लोहारा तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य वाटप.

चालू वर्षी धाराशिव जिल्ह्यात सरासरीच्या 161 टक्के पाऊस झाला असून लोहारा उमरगा तालुक्याला देखील प्रचंड फटका बसला आहे शेतकऱ्याच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत. शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. पशुधन वाहून गेलेले आहे .रस्ते, पूल, वाहून गेलेले आहेत .

Advocate Sheetal Foundation Flood Relief

विद्युत व्यवस्था कोलमडलेली आहे. पाझर तलाव फुटलेले आहेत अशा कठीण आणि नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडात नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून अनेक सामाजिक संस्था सध्या कार्यरत झाले आहेत.नेहमीच लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या ॲडव्होकेट शितल फाउंडेशन च्या वतीने आज लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे पावसाने पूर्ण घर पडलेल्या मुलांनी कुटुंबाला तसेच त्या गावात अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले.

Advocate Sheetal Foundation Flood Relief

लोहारा येथे अतिवृष्टीचा तडाका बसलेल्या काही कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले नागोर येथे तेरणा नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या कैलासवासी बालाजी मोरे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करून त्यांनाही संसार उपयोगी साहित्य देण्यात आले तसेच नागोर गावातील काही कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य देण्यात आले त्यानंतर भातागळी गावातील अतिवृष्टीने संसार मोडकळीस आलेल्या गावातील काही कुटुंबीयांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.

Advocate Sheetal Foundation Flood Relief


यावेळेस शितल फाउंडेशनचे प्रमुख ॲडव्होकेट शीतल चव्हाण, शेतकरी नेते अनिल जगताप, तालुका शिवसेनाप्रमुख अमोल बिराजदार ,ॲडव्होकेट सयाजी शिंदे , गणेश फत्तेपुरे, अकबर तांबोळी, वैभव जगताप, फाउंडेशनचे पदाधिकारी त्या त्या गावातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

कुठलाही राजकीय स्वार्थ न पाहता केवळ सामाजिक बांधिलकी जपत ॲडव्होकेट शितल फाउंडेशन उमरगा यांनी केलेलं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे असेच गौरव उदगार प्रत्येक गावातील नागरिकाकडून निघत होते.