पुणे: आयटी नागरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Hinjawadi IT Park आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे Hinjawadi IT Park चे वॉटर पार्क झाले होते.या सततच्या समस्से मुळे आयटी पार्क मधील काही अभियंत्यांनी आंदोल सुद्धा केली होती.विरोधकांनी तर थेट सोशल मीडिया वरती पाण्यातून बसेस जात असतानाचे व्हिडिओ शेअर करत, आयडी पार्क चे वॉटर पार्क झाले आहे अशी जाहीर टीका केली होती.
अजित दादा Hinjawadi IT Park मध्ये सकाळी सहा वाजताचं दाखल:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी (शनिवार,26 जुलै 2025) सकाळी वाजता Hinjawadi IT Park ला भेट दिली.येथे होणारी सततची वाहतूक कोंडी,पायाभूत सुविधानचा अभाव आणि वाढती गुन्हेगारी या सर्व बाबींचा आढावा घेण्याकरिता आज Hinjawadi IT Park येथे दाखल झाले .
सरपंचाला सुनावले खडेबोल:

- Hinjawadi IT Park
सर्व बाबींचा आढावा घेऊन अजित पवार गाडीत बसत असताना हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभूळकर हे अजित पवारांशी काही तरी बोलत होते, “साहेब तुम्हाला सांगायचे आहे ते सांगा,मला काय करायचे आहे ते मी करतो”,आपल वाटोळ होत आहे Hinjawadi IT Park पुण्यातून बाहेर जात आहे बंगलुरुला जात आहे.मला कळत नाही काय,हे सगळे माझे लोक आहेत.असे खडेबोल हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभूळकर यांना सुनावले .
Hinjawadi IT Park पुण्यातून बाहेर का जात आहे ?
- वाढती वाहतूक कोंडी
- वाढती लोकसंख्या
- मूलभूत सुविधांचा अभाव
- टोकाची गुन्हेगारी प्रवृत्ती
- आभाळा जाऊन टेकलेले जागेचे भावअशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या मुळे Hinjawadi IT Park मधील कंपन्या पर्यायी मार्गांची चाचपणी करताना आपल्या दिसून येते आहे.
अजित पवारांच्या प्रशासनाला सक्त सूचना:
उपमुखमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या की विकास कामात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.यावेळी पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनकुमार चौबे उपस्थित होते.