अतिवृष्टी अनुदान मिळवून दिल्याबद्दल अनिल जगताप यांचा त्यांच्या मुळ गावी भातागळी येथे भव्य सत्कार

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

अतिवृष्टी अनुदान मिळवून दिल्याबद्दल अनिल जगताप यांचा भातागळी येथे भव्य सत्कार

भातागळी (ता. लोहारा, जि. धाराशिव) – लोहारा-उमरगा तालुक्यातील 2024 मधील अतिवृष्टी अनुदान जवळपास एक वर्ष प्रलंबित होते. शेतकऱ्यांच्या या न्याय्य मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल जगताप यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून अखेर राज्य शासनाकडून मंजुरी मिळवून दिली. 29 एप्रिल 2025 रोजी शासनाने अधिकृत शासन निर्णय काढून या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला.

अनुदानाचे तपशील!

तालुकालाभार्थी शेतकरीमंजूर अनुदान रक्कम (₹)
उमरगा49,68252 कोटी 75 लाख
लोहारा30,83233 कोटी 70 लाख
एकूण79,88086 कोटी 46 लाख 34 हजार

शेतकऱ्यांसाठी लढा आणि यश!

अतिवृष्टी अनुदान मिळवून दिल्याबद्दल अनिल जगताप यांचा त्यांच्या मुळ गावी भातागळी येथे भव्य सत्कार

या मंजुरीसाठी श्री. अनिल जगताप यांनी 30 एप्रिल 2025 रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शासनावर दबाव आणला. त्यांच्या जिद्दी, चिकाटी आणि शेतकरीहिताच्या भूमिकेमुळे अखेर शासन निर्णय झाला आणि हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

भव्य सत्कार सोहळा!

अतिवृष्टी अनुदान मिळवून दिल्याबद्दल अनिल जगताप यांचा त्यांच्या मुळ गावी भातागळी येथे भव्य सत्कार

या उल्लेखनीय कार्याबद्दल आ. प्रवीण स्वामी, सक्षणाताई सलगर, श्री. आनंद पाटील, अजिंक्य बापू पाटील, अमोल बिराजदार आणि भातागळी ग्रामस्थांच्या वतीने अनिल जगताप यांचा त्यांच्या मूळ गावी भातागळी येथे सत्कार करण्यात आला.

अतिवृष्टी अनुदान मिळवून दिल्याबद्दल अनिल जगताप यांचा त्यांच्या मुळ गावी भातागळी येथे भव्य सत्कार

आजपर्यंत लोहारा-उमरगा तालुक्यातील 28 गावांमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला असून, सत्कार करण्यासाठी गावांमध्ये चढाओढ सुरू आहे. उंडरगाव, हराळी, नागोर, नागराळ, मोघा, हिप्परगा सय्यद, कलदेव, निंबाळा, नाईचाकूर अशा अनेक गावांत सत्कार कार्यक्रम झाले आहेत.

कार्यक्रमातील योगदान!

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. सतीश पाटील, हनुमंत जगताप, गणेश फत्तेपूर, दयानंद गरजे, रोहन जगताप, लक्ष्मण चव्हाण, युवराज तात्या पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.