धाराशिव : Ativrushti Anudan : अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी केवायसी करायची की ॲग्री स्टिक नंबर वर शासनाचे अनुदान मदत मिळणार याबाबत शासकीय धोरणात , शासनाने स्पष्टता आणावी. शेतकरी नेते अनिल जगताप यांची प्रसिद्धी पत्रकार द्वारे मागणी.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असून सरासरीच्या 161 टक्के इतका पाऊस झाला आहे आणि ठिकाणी जमिनी खरवडून गेले आहेत, पशुधन वाहून गेलेला आहे ,रस्ते ,पूल बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेले आहेत ,विद्युत विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी मनुष्यहानी देखील झालेली आहे.
शासकीय नियमानुसार पंचनामे पूर्ण झाली असून ऑगस्ट मधील अहवाल शासनाकडे गेला त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 34 हजार 955 शेतकऱ्यांना शासनाने 189 कोटी 60 लाख 67 हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे.
सुरुवातीला गाव कामगार तलाठी यांनी याद्या तयार करून तहसील कडे पाठवल्या त्यानंतर त्या याद्या मंत्रालयात गेल्या त्यासाठी व्हीके नंबर ही देण्यात आला विशिष्ट क्रमांक आणि विशिष्ट क्रमांका नुसार केवायसी करण्याचा सल्ला पूर्वी शासनाकडूनच दिला गेला होता.
मात्र अचानकपणे दोन दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री यांनी ॲग्री स्टिक नंबर द्वारे पैसे पडतील केवाय शिक करायची आवश्यकता नसल्याचे जाहीर केलेत्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे केवायसी करायची का नाही याबाबत निश्चितता नाही. शासनाने धोरण आणि वास्तव यात एक वाक्यता ठेवायला पाहिजे.
विशेष म्हणजे आजही धाराशिव जिल्ह्यात ॲग्रीस्टिक अर्थात फार्मर आयडी न काढलेले 40 टक्के पेक्षा जास्त शेतकरी आहेत मग केवळ ॲग्री स्टिक नंबर द्वारेद्पैसे द्यायचे ठरले तर अशा शेतकऱ्यांना पैसे पडणार की नाही अशी विचारणा अनेक शेतकरी बांधवाकडून होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी संख्या व ॲग्री स्टिक केलेल्या शेतकऱ्यांची संख्या तालुका निहाय पुढील प्रमाणे आहे …
तालुका | एकूण खातेदार संख्या | ॲग्री स्टिक केलेले शेतकरी | टक्केवारी (%) |
भूम | 55,583 | 39,461 | 71% |
धाराशिव | 90,527 | 67,955 | 75% |
कळंब | 64,791 | 51,381 | 79% |
लोहारा | 30,740 | 23,381 | 76% |
उमरगा | 58,761 | 44,644 | 76% |
परंडा | 54,403 | 38,766 | 71% |
तुळजापूर | 88,151 | 61,012 | 69% |
वाशी | 34,088 | 27,633 | 81% |
एकूण | 4,77,044 | 3,54,214 | 74% |
भूम तालुक्यात 55 हजार 583 खातेदार संख्या असून 39 हजार 461 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केलेले आहे. धाराशिव तालुक्यात 90 हजार 527 खातेदार संख्या असून 67 हजार 955 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केले आहे. कळम तालुक्यात 64791 खातेदारांची संख्या असून 51 हजार 381 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केले आहे.
लोहारा तालुक्यात 30740 खातेदारांची संख्या असून ते 23381शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केले आहे. उमरगा तालुक्यात 58,761 खातेदारांची संख्या सून 44 हजार 644 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केले आहे. परंडा तालुक्यात 54,403 खातेदारांची संख्या असून 38 हजार 38766 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केले आहे. तुळजापूर तालुक्यात 88 हजार 151 शेतकऱ्यांची संख्या असून 61012 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केली आहे.

वाशी तालुक्यात 34 हजार 88 शेतकरी संख्या असून 27 हजार 633 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केली आहे. एकंदरीत पाहता जिल्ह्यातील 4 लाख 77 हजार 44 खातेदारांपैकी 3 लाख 54हजार 214 शेतकऱ्यांनी ॲग्री स्टिक केलेले आहे.
उमरगा लोहारा तालुक्याला शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या प्रयत्नाने अतिवृष्टीचे 2024 चे 86 कोटी 46 लाख 34 अनुदान मंजूर झाले असून त्यासाठी तर केवायसी करणे गरजेचे आहे कारण मुख्यमंत्र्यांनी 2025 च्या अतिवृष्टी संदर्भात ॲग्रीकॅस्टिक द्वारे पैसे मिळतील असे जाहीर केले आहे.

एकूणच राज्य शासनाने धोरण आणि वास्तव यामध्ये एक वाक्यता आणून काय ती स्पष्टता आणावी जेणेकरून अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला शेतकरी आणखी चलविचल व्हायला नको व त्याला वेळेवर आर्थिक मदत व्हायला हवी.