Chhava Sanghatna: IAS अधिकाऱ्याच्या कानाखाली मारून चर्चेत आलेल्या छावा संघटनेचा असा आहे इतिहास.

Picture of इंद्रजीत पवार

इंद्रजीत पवार

लातूर : अनेक मराठा संघटनांपैकी छावा ही एक अत्यंत महत्त्वाची संघटना मानली जाते मराठवाड्यातील खास करून लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून उदयास आलेली Chhava Sanghatna ही पहिल्यांदा एका IAS अधिकार्याच्या कानाखाली मारून चर्चेत आली.छावा ही संघटना कायमच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत राहिली आहे.

Chhava Sanghatna इतिहास:

1990 मध्ये chhava Sanghatna उदयास आली. अण्णासाहेब जावळे पाटील हे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष होते. लातूर येथे अण्णासाहेब जावळे पाटील यांनी एका IAS अधिकाऱ्याच्या कानाखाली मारली होती.यामुळे छावा ही संघटना महाराष्ट्रभर नावारुपास आली. छावा ही संघटना कायमच आपल्या आक्रमक शैली मुळे महाराष्ट्रभर चर्चेत राहत आली आहे. लातूर जिल्ह्यात छावा ही संघटना खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

Suraj Chavhan Vs Chhava Sanghatna:

नुकतीच Chhava sanghatna परत एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे लातूर मध्ये आले आसता छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी केले. संदर्भ होता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रम्मी खेळत असल्याचा. विजयकुमार घाडगे यांनी सुनील तटकरेच्या समोर पत्ते उधळून निषेध व्यक्त केला शिवाय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजनाम्याची मागणी केली. याच कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष Suarj Chavhan यांनी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे आणि कार्यकर्त्यांना मारहाण केली.

मारहाणीचे पडसाद:

सुरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद राज्यभर उमटले आहेत.छावा संघटनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे.मारहाणीच्या निषेधार्थ लातूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.लातूर सह या मारहाणीचे पडसाद मराठवाड्यातील धाराशिव (D harashiv ), बीड (Beed) जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत.