धाराशिव : Crop Insurance : सर्वोच्च न्यायालयात 23 फेब्रुवारीला 134 कोटी रुपयांच्या निधीला स्थगिती मिळावी म्हणून शासन जिल्हा प्रशासनाकडे निधी वर्ग करत नाही का अनिल जगताप यांचा शासनाला जळजळीत सवाल..

खरीप 2020 च्या संदर्भात 24 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयाने निकाल देत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला जवळपास 234 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी दोन महिन्याचे अर्थ 24 जानेवारी ची मुदत दिली होती मात्र शासनाने वेळेत पैसे दिले नाहीत तसेच उच्च न्यायालयात जमा असलेले 75 कोटी वर त्यावरील व्याज मिळून जवळपास 94 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले मात्र योग्य ते अकाउंट नसल्याचे कारण देत तेही पैसे वाटप झाले नाहीत.. दरम्यानच्या कालखंडात पिक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली आणि 94 कोटी रुपये स्थगिती आदेश मिळाला.

राज्य शासनाकडे पिक विमा कंपनीचा 134 कोटी रुपयाचा हप्ता देय होता तो तरी प्रशासनाकडे द्यावा यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केले शेवटी 11 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निघाला मात्र अद्याप पर्यंत निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही .

आता या संदर्भात 23 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असून त्याला देखील स्थगिती मिळावी यासाठी निधी वर्ग केला जात नाही का असा प्रश्न आणि जगताप यांनी उपस्थित केला आहे कारण 134 कोटी रुपयाला सध्या सर्वोच्च न्यायालयाचा तोंडी किंवा लेखी कुठलाही स्थगिती आदेश नाही ते पैसे जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले असते तर तातडीने शेतकऱ्यांना वाटप करता आले असते मात्र तसे होताना दिसत नाही.

राज्य शासन शेतकऱ्याचे हित पाहण्याऐवजी पिक विमा कंपनीचे हित पाहत आहे असे एकंदरीत घटनाक्रमावरून दिसत असल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले उच्च न्यायालयाचा निकाल लागून सुरुवातीला दोन महिन्याचा कालावधी उलटून देखील पैसे दिले गेले नाहीत आता केवळ शासन निर्णय काढला असून पैसे वर्ग केले जात नाहीत

23 फेब्रुवारीला सुनावणी होऊन जर त्याला स्थगिती मिळाली तर पूर्वीचे 94 कोटी व आत्ताचे 134 कोटी न्यायालयीन प्रक्रियेच्या कचाट्यात अडकून पडणार आहेत त्यामुळे अगोदरच 2020 चा विमा मिळाला 26 साल उजडावे लागले आता आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार व शेतकऱ्यांची आणखी किती चेष्टा करणार असा जळजळीत सवाल देखील अनिल जगताप यांनी विचारला आहे.
मुख्यमंत्र्याकडे निधी वितरणाची केली मागणी..

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल पाठवून प्राप्त 134 कोटी रुपये तातडीने वर्ग करून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप करावे अशी विनंती अनिल जगताप यांनी केली आहे. मेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून रिप्लाय आला असून संबंधित खात्याकडे आपला अर्ज पाठवत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले असल्याचे अनेक जगताप यांनी सांगितले.


