पीक विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय — धाराशिव जिल्ह्यातील 75 हजार शेतकरी अजूनही भरपाईशिवाय!

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

धाराशिव, 14 ऑगस्ट 2025 — खरीप 2024 हंगामातील पीक काढणी (Post-Harvest) कव्हर अंतर्गत अजूनही धाराशिव जिल्ह्यातील 75 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही, असा गंभीर आरोप पीक विमा याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी केला आहे. राज्य शासनाने पीक विमा कंपनीला रक्कम दिल्याचे जाहीर असूनही, शेतकऱ्यांचे पैसे थांबवले जाणे हा सरळ अन्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरीप 2024 हंगामाची पार्श्वभूमी!

  • एकूण अर्जदार शेतकरी: 7,19,167
  • विमा कंपनी: एचडीएफसी
  • एकूण प्रीमियम रक्कम (शेतकरी + राज्य + केंद्र): ₹596.95 कोटी
  • नैसर्गिक आपत्ती: अतिवृष्टी व अवकाळी पाऊस
  • नुकसान पूर्वसूचना: 72 तासांच्या आत शेतकऱ्यांकडून नोंदणी पूर्ण
  • कंपनीकडून वितरित रक्कम: ₹218.08 कोटी (5,19,147 शेतकऱ्यांना)

तालुका-निहाय वितरित मदत!

तालुकावितरित रक्कम (₹)
भूम17 कोटी 01 लाख
धाराशिव50 कोटी 55 लाख
कळम36 कोटी 28 लाख
लोहारा17 कोटी 00 लाख
परंडा08 कोटी 56 लाख
तुळजापूर45 कोटी 59 लाख
उमरगा25 कोटी 96 लाख
वाशी17 कोटी 72 लाख
एकूण₹218.08 कोटी

अजूनही थकलेली रक्कम!

पीक विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय — धाराशिव जिल्ह्यातील 75 हजार शेतकरी अजूनही भरपाईशिवाय!
  • पोस्ट-हार्वेस्ट अंतर्गत: ₹50 कोटी (75 हजार शेतकऱ्यांना देय)
  • ₹1000 पेक्षा कमी विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना: राज्य शासनाची ₹1.25 कोटी सबसिडी मिळाल्यानंतर अतिरिक्त रक्कम देणे अपेक्षित
  • शासनाने रक्कम कंपनीला दिल्याची खात्री, तरीही वितरण थांबलेले

अनिल जगताप यांची तीव्र भूमिका!

“11 ऑगस्ट रोजीच उर्वरित नुकसान भरपाईचे वितरण व्हायला हवे होते. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या जाहीर घोषणेला 3 दिवस उलटून गेले, तरीही एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात नाही. पीक विमा कंपनीचा हा उघड अन्याय तातडीने थांबवा. अन्यथा 75 हजार शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल.”