Dharashiv Development : धाराशिव : गौरवशाली वारशातून ‘स्थगितीच्या जिल्ह्या’कडे

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

धाराशिव: Dharashiv Development : संत-मौलानांचा व स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा लाभलेल्या धाराशिव जिल्ह्याला आज “स्थगितीचा जिल्हा” अशी नवी ओळख मिळते आहे.

संत-मौलानांचा वारसा, स्वातंत्र्य सैनिकांची भूमी

Dharashiv Development

धाराशिव (उस्मानाबाद) हा जिल्हा केवळ आई तुळजाभवानी मंदिरामुळे प्रसिद्ध नाही तर संत परंपरा, स्वातंत्र्य चळवळ आणि समाजवादी विचारसरणीमुळे देखील महाराष्ट्रात वेगळं स्थान राखतो.

भाई उद्धवराव पाटील, माणिकराव खपले, डॉ. पद्मसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण यांसारख्या दिग्गजांनी जिल्ह्याचा विकासाचा पाया रचला.

मात्र आजचा धाराशिव हा राजकीय संघर्ष, स्थगित विकास निधी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे “स्थगितीचा जिल्हा” म्हणून ओळखला जातो.

आजचं राजकारण : कुरुक्षेत्

Dharashiv Development

धाराशिव जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत ढवळून निघालेली आहे.

  • खासदार – उद्धव ठाकरे गटाचे
  • 2 आमदार – उद्धव ठाकरे गटाचे
  • 1 आमदार – भाजप
  • 1 आमदार – शिंदे सेना

एखाद्या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष होतो. परिणामतः विकास निधीवर गदा येते.

विकास निधीला स्थगिती – जिल्ह्याची नवी ओळख

सामान्यतः नेते राज्य सरकारकडून निधी आणून विकास करतात. पण धाराशिवमध्ये चित्र उलटं आहे.

योजना / प्रकल्पमंजूर रक्कमसद्यस्थिती
नगरोत्थान महाअभियान – रस्ते काम₹१४० कोटीस्थगित
धाराशिव शहरातील ५९ डीपी रस्तेमंजूरकाम सुरू नाही
जिल्हा नियोजन समिती कामे₹४०८ कोटींपैकी २६८ कोटीस्थगित
तुळजाभवानी विकास आराखडा₹१,८६५ कोटीराजकारणात अडकलेला

तुळजाभवानी विकास आराखडा – राजकारणात अडकलेला

Dharashiv Development

तुळजाभवानी मंदिर व तुळजापूर शहराच्या विकासासाठी ₹१,८६५ कोटींचा आराखडा मंजूर झाला होता. यातून मंदिर परिसराचा कायाकल्प, आधुनिक सुविधा आणि भाविकांसाठी सोयी होणार होत्या.

  • पालकमंत्री व स्थानिक आमदारांमध्ये श्रेयवाद
  • ड्रग्स प्रकरणामुळे तुळजापूरची नाहक बदनामी
  • अपेक्षांपेक्षा आरोप-प्रत्यारोप

यामुळे हा आराखडा अद्याप अडकून पडला आहे.

शेतकऱ्यांची शोकांतिका

धाराशिव जिल्हा हा शेतकरी आत्महत्यांचा केंद्रबिंदू बनला आहे.

गेल्या वर्षभरात १७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या जिल्हा मध्यवर्ती बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर जिल्हा दूध संघ बंद; जागा विक्रीला सहकारी साखर कारखाने अस्तंगत, खाजगी कारखान्यांचा जोर बेकायदेशीर गुळ-पावडर कारखान्यांचा विस्तार

या सर्वामुळे सर्वसामान्य शेतकरी व नागरिक भरडला जात आहे.

स्थगिती नव्हे तर प्रगतीची गरज

धाराशिवकर आजही वाट पाहतोय –

“तो दिवस कधी येईल, जेव्हा आपला जिल्हा स्थगिती नव्हे तर प्रगतीच्या ओळखीने महाराष्ट्रात उभा राहील?”