Dharashiv Pikvim : नवी पिक विमा योजना व 30 एप्रिल 2024 च्या केंद्रशासनाच्या पिक विमा विषयक परिपत्रकामुळे धाराशिव जिल्ह्याचे 800 कोटी रुपये चे नुकसान

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

धाराशिव : Dharashiv Pikvim / शेती पिकाचे नुकसान होऊनी शेतकऱ्याच्या पदरी निराशाच .शेतकरी नेते अनिल जगताप यांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती.

यावर्षी धाराशिव जिल्ह्यात 24 मे पासून सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबायचे नाव घेत नाही धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असून हाता तोंडाशी आलेले पिके वाया गेलेली आहेत त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे अनेक ठिकाणी मनुष्यहानी झाली असून पशुधन ही मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून नदीलगत तसेच ओढ्यालगत बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहेत.

राज्य शासनाने यावर्षी नवीन पिक विमा योजना आणली असून , नुकसान भरपाई देण्याचे तीन ट्रिगर रद्द केले असून केवळ पीक कापणी प्रयोगा आधारे आता शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार शेतकऱ्यांनी चार लाख 92 हजार अर्जाद्वारे आपला पिक विमा भरला आहे. पेरणी पासून काढणीपर्यंत केवळ पीक कापणी प्रयोगा आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे यावर्षी पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग देखील घटला आहे.

Dharashiv Pikvim

गेल्या वर्षी राज्यातील एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता मात्र यावर्षी केवळ 92 लाख शेतकऱ्यांनीच पिक विमा भरला आहे. पिक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे कारण देत राज्य सरकारने नवीन योजना लागू केली. गेल्या वर्षी पिक विमा कंपनीला केंद्र राज्य व शेतकरी हिस्सा मिळून जवळपास आठ हजार कोटी रुपये गेले होते मात्र यावर्षी ती रक्कम केवळ 2393 कोटी रुपये इतकी आहे.

राज्य शासनाने नवीन पिक विमा योजनेतील ट्रिगर बंद केल्याने यावर्षी अतिवृष्टी होऊन पिकाचे अतोनात नुकसान होऊन देखील पीक नुकसानीच्या पूर्व सूचना देता आल्या नाहीतर त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये मिळणारे पीक विमा योजनेतील नुकसान यावर्षी शेतकऱ्यांना मिळणार नाही. केंद्र शासनाचे 30 एप्रिल 2024 चे परिपत्रक लागू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती अंतर्गत दोन्ही वर्षी जवळपास 200 ते 230 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती.

30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकानुसार जर एखाद्या महसूल मंडळातील 25% पेक्षा जास्तीच्या पूर्वसूचना गेल्या तर केवळ 25 टक्केच रक्कम दिली जाते याचा अर्थ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे 800 कोटी रुपये मिळाले असते मात्र त्या नुकसान भरपाई पासून धाराशिव जिल्हा यावर्षी वंचित राहणार आहे. अतिवृष्टी झाल्याने एका बाजूला नवीन पीक विमा योजनेनुसार तुटपुंजी नुकसान भरपाई मिळेल तर अतिवृष्टीमुळे हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीनचे जवळपास 500 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे ते कधीही भरून निघणार नाही.

शेतकरी नेते अनिल जगताप यांची प्रतिक्रिया..

Dharashiv Pikvim

यावर्षी राज्य शासनाने नवीन पिक विमा योजना आणली त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली राज्यातील केवळ 92 लाख शेतकऱ्यांनीच पिक विमा भरला आहे. जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन देखील नवीन पिक विमा योजनेतील तरतुदीचा फटका शेतकऱ्याला बसला आहे. बळीराजाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे एका बाजूला अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर दुसऱ्या बाजूला नवीन पिक विमा योजनेतील तरतुदीमुळे पीक नुकसान भरपाई अतिशय नगण्य मिळणार आहे. राज्य शासनाने या बाबीचा गांभीर्याने विचार करून पुढच्या वर्षी तरी जुनी पीक विमा योजना लागू करावी ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.