धाराशिव : Dharashiv Pikvima : आता न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा. शेतकरी नेते अनिल जगताप यांची माहिती.
खरीप 2020 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाख 48 हजार 990 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता 72 तासात पूर्व सूचना दिल्या नाहीत म्हणून धाराशिव जिल्ह्यातील केवळ 79 हजार शेतकऱ्यांना 56 कोटीचे वाटप केले गेले.
त्याविरुद्ध शेतकरी व लोकप्रतिनिधींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार रुपये देण्याचे आदेश दिले नंतर कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेली सर्वोच्च न्यायालयाने पिक विमा कंपनीकडून 200 कोटी रुपये भरून घेत हे प्रकरण चालवले.

दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना 376 कोटी रुपयांचे वाटप झाले होते कंपनीकडून येणे रक्कम 605 कोटी रुपये होती उर्वरित रक्कम कंपनी देत नव्हती म्हणून जिल्हाधिकारी धाराशिव यांनी कंपनीविरुद्ध महसुली कारवाई सुरू केली होती त्याला पिक विमा कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या महसुली कारवाईच्या आदेशाला स्थगिती देताना पिक विमा कंपनीकडून दीडशे कोटी रुपये भरून घेतले होते त्यातील 75 कोटी रुपये वाटप झाले आहेत. आणखी 75 कोटी रुपये उच्च न्यायालयात जमा आहेत.
उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलाचे युक्तिवाद पूर्ण झाले होते उच्च न्यायालयाने 10 सप्टेंबर अर्थात आज दोन्ही बाजूकडून लेखी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज दोन्ही बाजूंनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले त्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून कुठल्याही क्षणी उच्च न्यायालयाचा आदेश येऊ शकतो.
बजाज अलायन्स पिक विमा कंपनीच्या विरोधामध्ये शेवटपर्यंत उच्च न्यायालयात भांडून शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्काची पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम कशी मिळेल या संदर्भात प्रयत्न केले त्याचा मनातून आनंद असल्याची भावना शेतकरी नेते अनिल जगताप यांनी बोलून दाखवली.