लोहारा : Fishery Rights Issue : माकणी धरणातील मच्छिमार बांधवांचा प्रश्न अनिल जगताप यांनी यांच्या पुढाकाराने सुटण्याच्या मार्गावर. सोमवारी सहआयुक्त मत्स्य लातूर यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक.
धरण निर्मितीपासून या भागातील ग्रहणग्रस्त मच्छिमार बांधव निम्न तेरणा प्रकल्प माकणी धरणामध्ये मासेमारी करतात, मात्र सदरील धरणाचे मासेमारीचे टेंडर माकनाई मच्छिमार या संस्थेस गेले आहे. सदरील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मूळ मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी रोखले असून आंध्र प्रदेश मधील 150 ते 200 मच्छीमार आणून मासेमारी केली जात आहे. सर्व मच्छिमार बांधवांनी ही बाब शेतकरी नेते अनिल जगताप यांना भेटून त्यांच्या कानावर घालून यात लक्ष देण्याची विनंती केली.

मच्छिमार बांधवाचे शिष्टमंडळ, अनिल जगताप तसेच एडवोकेट शाम जावळे पाटील या सर्वांनी मिळून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांनाही बाब अवगत केली तातडीने त्यांनी सहयुक्त मत्स्य व्यवसाय लातूर यांना फोन करून या प्रकरणात तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या तसेच प्रशासनाकडेही अर्थात निवासी उपजिल्हाधिकारी धाराशिव यांना भेटून देखील निवेदन देण्यात आले त्यांनीही दूरध्वनीवरून तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या वेगाने दिवसभरात झालेल्या घडामोडींनी चक्र फिरली गेली.
तेजस्विनी कराळे आयुक्त मत्स्य व्यवसाय लातूर यांनी यासंदर्भात पत्र काढून 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या दालनामध्ये सोमवारी बैठकीचे आयोजन केले असून यातून मार्ग निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी या संदर्भात कालच पत्र काढले आहे.

जवळपास तीनशे मच्छिमार कुटुंबाच्या व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या साधारणता दीड एक हजार लोकांच्या उदरनिर्वाचा प्रश्न असल्याने ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण होती त्यात श्री अनिल जगताप यांनी लक्ष घातलून राजकीय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व बाबीची तांत्रिक माहिती देऊन शासन निर्णयातील विविध दाखले देऊन तातडीने बैठक लावून मच्छीमाराचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात हालचाली गेल्याबद्दल मच्छीमार बांधवातून त्यांच्याविषयी समाधान व्यक्त होत आहे. सोमवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




