अनिल जगताप यांच्या प्रयत्नांना यश, उर्वरित शेतकऱ्यांना मिळू लागले अनुदान | Heavy Rain Compensation 2024

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Heavy Rain Compensation 2024 : लोहारा उमरगा तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्याच्या खात्यावर अतिवृष्टी अनुदान 2024 पुन्हा पडायला सुरुवात सामाजिक कार्यकर्ते आणि जगताप यांची माहिती.

Heavy Rain Compensation 2024

2024 मध्ये लोहारा उमरगा तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली होती मात्र जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात लोहारा उमरगा तालुक्याला वेगळे होतील तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासमोर ही बाब अनिल जगताप यांनी मांडल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून लोहारा उमरगा तालुक्यातील महसूल व कृषी प्रशासनाला आदेश आल्यानंतर पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठवला गेला यात लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये नुकसान भरपाई झाल्याचा अहवाल दिला गेला.

सदरील प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेल्यानंतर एक वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंत्रालयामध्ये गेला आणि त्याला मग अंतिम मंजुरी मिळाली व लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये मंजूर झाले होते त्यातील जवळपास 66 हजार शेतकऱ्यांच्या रकमेची वितरण झाले असून उर्वरित शेतकऱ्याच्या रकमेचे वितरण आजपासून पुन्हा सुरू झालेली आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत सर्वांशी संपर्क साधून हे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर कसे वर्ग होईल याबाबत सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कृतीचे शेतकरी वर्गातून कौतुक होत असून समाधान व्यक्त होत आहे

Heavy Rain Compensation 2024

अतिवृष्टीचे 2024 चे 2020 मध्ये लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे. मात्र अनिल जगताप यांनी एकट्याने दिलेल्या लढ्याला यश मिळाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.