Hotel Shaurya Wada : हॉटेल मालकाची गगनभरारी, घेतली नवी कोरी Defender गाडी – किंमत ऐकून व्हाल थक्क!

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

पुणे : Hotel Shaurya Wada : हॉटेल व्यवसायात सोशल मीडियाचा प्रभाव किती मोठा असतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे Hotel Shaurya Wada. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर या हॉटेलची चर्चा जोरदार सुरु आहे. आणि आता पुन्हा एकदा Shaurya Wada चर्चेत आलंय, कारण हॉटेलचे मालक विकास हांडे यांनी नुकतीच नवी कोरी Defender कार विकत घेतली आहे. या गाडीची किंमत ऐकून तुम्हीदेखील थक्क व्हाल!

Defender Price in India : किती आहे गाडीची किंमत?

Defender Price in India : ऑफ-रोडिंग आणि लक्झरी कार प्रेमींसाठी Land Rover Defender ही गाडी स्वप्नवत मानली जाते. तिचा दमदार लुक आणि परफॉर्मन्स यामुळे भारतात गेल्या काही वर्षांत याची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे.

  • बेस मॉडेल किंमत : सुमारे ₹1.50 कोटी
  • टॉप मॉडेल किंमत : तब्बल ₹2.80 कोटी पर्यंत

आता ही लक्झरी गाडी Hotel Shaurya Wada च्या पार्किंगमध्ये झळकणार आहे.

Hotel Shaurya Wada on Social Media : सोशल मीडियावर गाजणारे हॉटेल

Hotel Shaurya Wada

Hotel Shaurya Wada on Social Media : Hotel Shaurya Wada हे फक्त पुण्यातील लोकप्रिय हॉटेल नाही, तर सोशल मीडियावरही याची जोरदार हवा आहे.

Instagram Followers : 5 लाखांपेक्षा जास्त प्रत्येक पोस्ट आणि रिल्सला हजारो-लाखो व्ह्यूज मिळतात यामुळे हॉटेलच्या ब्रँडिंगला मोठा हातभार लागतो.सोशल मीडियाचा योग्य वापर करून हॉटेल व्यवसायात कशी झपाट्याने प्रगती करता येते, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

Vikas Hande Success Story : गावचे उपसरपंच ते 11 शाखांचे मालक

Vilas Hande Success Story : हॉटेल शौर्य वाड्याचे मालक विकास हांडे यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे.

सुरुवातीला त्यांना राजकारणात रस होता. हांडेवाडी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते उपसरपंच म्हणून निवडून आले होते. मात्र नंतर त्यांनी राजकारणाऐवजी हॉटेल व्यवसायावर लक्ष केंद्रीत केले. त्यांचा व्यवसाय इतका वाढला की आज Shaurya Wada च्या तब्बल 11 शाखा सुरु आहेत.

गावातून निघालेला एक तरुण, मेहनत आणि दृष्टीकोनाच्या जोरावर आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभा करू शकतो, याचं उदाहरण म्हणजे विलास हांडे आणि Hotel Shaurya Wada.

प्रत्येक तरुणानी प्रेरणा घ्यावा असा प्रवास :

Hotel Shaurya Wada आणि त्यांचे मालक विकास हांडे यांची यशोगाथा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा आहे. सोशल मीडिया, मेहनत आणि योग्य व्यावसायिक दृष्टिकोनाचा संगम असेल तर मोठं स्वप्न सत्यात उतरवता येतं.