Lohara : गटशिक्षण अधिकारी कार्यालय लोहारा यांच्यावतीने उद्या दिनांक 23 सप्टेंबर रोजी तालुक्यातील बारा शिक्षकांचा आदर्श तालुका पुरस्काराने तसेच मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा टप्पा क्रमांक दोन या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सहा शाळांचा होणार गौरव.

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Lohara : लोहारा गटशिक्षण विभागाने तालुक्यातील विविध बारा शाळेतील बारा शिक्षकांची तालुका आदर्श पुरस्कारासाठी निवड केली आहे तसेच मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेमधील तीन तर खाजगी शाळेमधील तीन शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे उद्या दुपारी दोन वाजता भानुदासराव चव्हाण महाविद्यालय लोहारा येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.


धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील हे राहणार आहे तर दीपप्रज्वलन लोहारा उमरग्याचे लोकप्रिय आमदार श्री प्रवीण स्वामी सर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक भैय्या जवळगे जिल्हा संघटक शिवसेना, श्री अमोल बिराजदार तालुकाध्यक्ष शिवसेना, श्री नरदेव कदम तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, श्री श्यामसुंदर तोरकडे तालुका अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस ,शेतकरी नेते अनिल जगताप, श्री सतीश इंगळे अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य श्री प्राध्यापक डॉक्टर रामदास ढोकळे तसेच लोहारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री जयदेव वगे ते उपस्थित राहणार आहेत.

Lohara

तालुक्यातील सर्वच शिक्षक प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कार्यालय लोहारा यांच्या वतीने करण्यात आलेल्या आहे.

मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत लोहारा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिल्हा परिषद प्रशाला केंद्रीय ब कासती यांना देण्यात आले असून द्वितीय पारितोषक जि प प्रशाला शाळा जेवळी दक्षिण यांना देण्यात आले आहे. तर तृतीय क्रमांकाचे पारितोषक जि प केंद्रीय प्रशाला अष्टा कासार यांना देण्यात आलेले आहे.

खाजगी शाळा मधील प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्री बसवेश्वर प्राथमिक शाळा जेवळी यांना देण्यात आले असून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वसंत दादा पाटील हायस्कूल लोहारा यांना देण्यात आले आहेत तर तृतीय क्रमांकाचे पारितोषक विद्या विकास हायस्कूल अचलेर यांना देण्यात आलेले आहे.

Lohara

दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो लोहारा तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना तालुका शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. सन 2025- 26 साठी ही निवड करण्यात आलेली आहे. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे व शाळांचे तालुक्यातील शिक्षक प्रेमी व नागरिकांकडून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.