(लोहारा) : Lohara Ativrushti 2025: शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी लोहारा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पिकाचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रत्यक्ष भेटून केली.
केलेल्या मागणीत त्यांनी म्हटले आहे की 27 ऑगस्ट रोजी रात्रभर मुसळधार पावसामुळे लोहारा तालुक्यातील चारही महसूल मंडळातील अनेक गावात शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार शेतामध्ये पाणी साचल्याने 50% पेक्षा जास्त नुकसान झाले असून काही ठिकाणी ओढ्याजवळ शेतीची माती वाहून गेली आहे.
यापूर्वी झालेल्या पावसामुळे पिके आधीच पिवळसर व कमकुवत झाली होती आता झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर मूक अधिक खरीप पिके हत्ती गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
अशा परिस्थितीत एस डी आर एफ एन डी आर एफ च्या निकषाप्रमाणे तसेच दुष्काळ संहिता 2016 प्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे त्यासाठी पंचनामे होऊन तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला जाणे महत्त्वाचे आहे म्हणून तातडीने पंचनामेचे आदेश देऊन तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला द्यावा अशी विनंती करण्यात आलेली आहे

यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्री अमोल बिराजदार, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष, नाना पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष. श्री रोग बागवान निशिकांत गोरे, तुकाराम वाकळे, रघुवीर घोडके, श्री जटे व राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष मिलिंद नागवंशी,ADV. सयाजी शिंदे, श्री. ओम पाटील, श्री. बसवराज पाटील, श्री. माणिक चिकटे, राजू स्वामी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काल कृषी विभागाच्या अहवालानुसार लोहारा तालुक्यात 68 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली असून तसा अहवाल कृषी विभागाने दिलेला आहे त्यामुळे आता तातडीने पंचनामा करणे क्रमप्राप्त आहे.