Manoj Jarange Patil | Maratha Reservation : अंतरवली असो किंवा मुंबई, संपुर्ण अष्टप्रधान मंडळ पाहत आहे आंदोलनाचं नियोजन.

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

(मुंबई) : Manoj Jarange Patil | Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मागणीला आता संपुर्ण महाराष्ट्रराज्यातून पाठिंबा मिळत आहे.याच आंदोलचा भाग म्हणून जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाला 29 ऑगस्ट रोजी आजाद मैदान (Aazad Maidan) मुंबई येथे येण्याचे आवाहन केले होते.त्याच आव्हानाला प्रतिसाद देत मराठा समाज मोठ्या संख्येने आजाद मैदानात (Aazad Maidan) दाखल झाला आहे.

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचं नियोजन कोण करत ?

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाचं नियोजन कोण करत असा सवाल अनेक वेळा उपस्थित केला जातो, तर याच उत्तर आहे मनोज जरांगे पाटील यांचं ‘अष्टप्रधान मंडळ’ हे संपूर्ण आंदोलनाचं नियोजन पोहत असत. आंदोलनाच्या ठिकाणची पार्किंगची सोय असो,खाण्याची व्यवस्था असो किंवा राहण्याची सोय असो अशा प्रकारची सर्व व्यवस्था हे ‘अष्टप्रधान मंडळ’ पाहत असत. यात सर्वांना आप-आपल्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत,त्याचं प्रमाणे हे ‘अष्टप्रधान मंडळ’ काम करत आहे.

अष्टप्रधान मंडळातील सदस्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या.

या अष्टप्रधान मंडळात एकूण आठ सदस्य असून प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत.नावे आणि जबाबदाऱ्या खालील प्रमाणे.

Pradip Solunke -प्रदीप सोळुंके

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

प्रदीप सोळुंके यांच्यावर Manoj Jarange Patil यांच्या सभांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या सभा कुठे होणार आणि तेथील सर्व व्यवस्थतेची जबाबदारी तसेच, मुंबई दौऱ्याची जबाबदारी प्रदीप सोळुंके यांच्यावर असते.

Pandurang Tarakh : पांडुरंग तारख

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

पांडुरंग तारख हे अंतरवली गावचे सरपंच आहेत,जरांगे पाटील यांच्या सावली सारखे ते जरांगे पाटील यांच्या सोबत असतात.जरांगे पाटील यांच्या सोबत तारख फार वर्षा पासून आहेत.प्रत्येक आंदोलनात तारख हे Manoj Jarange Patil यांच्या सोबत असतात.

Gangadhar Kalkute : गंगाधर काळकुटे

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

गंगाधर काळकुटे हे Manoj Jarange Patil यांच्या सोबत साष्ट पिंपळगाव येथील आंदोलनापासून सोबत आहेत.दौऱ्याच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी काळकुटे यांच्या खांद्यावर असते.तसेच बीड जिल्ह्यातील दौऱ्याच्या नियोजनाची संपूर्ण जबाबदारी काळकुटे यांच्यावर आहे.

Narayn Shinde : नारायण शिंदे

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

नारायण शिंदे हे नागझरी गावचे सरपंच आहेत,Manoj Jarange Patil यांच्या जुन्या सहकाऱ्यांपैकी एक सहकारी आहेत.आंदोलनासंदर्भातील बैठकांच नियोजन तसेच आंदोलनासंदर्भातील प्रशासकीय काम हे शिंदे सांभाळतात.

Shriram Kurnakar : श्रीराम कुरनकर

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

कोपर्डी आंदोलनात कुरनकर Manoj Jarange Patil यांच्या सोबत होते, कुरनकर हे Jarange Patil यांचे जुने सहकारी आहेत. प्रशासकीय काम आणि मंत्र्यांशी संपर्काचे कामाची जबाबदारी कुरनकर यांच्या खांद्यावर आहे.

Dada Ghadge : दादा घाडगे

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

दादा घाडगे सुरुवातीपासूनचा विश्वासू सहकारी आणि अगदी जवळचे मित्र,अंतरवली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत.आंदोलनासंदर्भातील आखणीची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Sanjay Katare : संजय कटारे

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

मराठा आरक्षण लढ्यातील सहकारी , गोदा काठच्या 123 गावांशी संपर्काचे आणि नियोजना संदर्भातील सर्व कामांची जबाबदारी संजय कटारे यांच्यावर आहे.

Ramesh Kale : रमेश काळे

Manoj Jarange Patil | Maratha Reservation

OBC असून सुद्धा Manoj Jarange Patil याच्या सोबत काळे काम करत आहेत. काळे हे वादिकाला गावचे सरपंच आहेत.अंगरक्षकाप्रमाणे काळे हे Jarange Patil यांच्या सोबत असतात .