लातुर : Marathvada Icon : नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा आज लातूर येथे मराठवाडा आयकॉन पुरस्काराने सन्मान करण्यात आला. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अभिमन्यू पवार नवभारत नवराष्ट्राचे मुख्य संपादक उपसंपादक संजय मलमे सर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी संदर्भात शेतकरी नेते अनिल जगताप यांचा आज लातूर येथे मराठवाडा आयकॉन हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शेतकरी नेते अनिल जगताप यांनी 2020 पासून 2025 पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून पीक विमा व अतिवृष्टी अनुदानात भरीव अशी कामगिरी केली असून त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 2900 कोटी रुपयांची मदत झालेली आहे.

खरीप 2024 मध्ये उमरगा लोहारा तालुक्याला अतिवृष्टी अनुदानातून वगळल्यानंतर विशेष असे प्रयत्न करून दोन्ही तालुक्यातील 80000 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख रुपये ची मदत मिळवून दिलेली आहे. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत नवभारत नवराष्ट्र वृत्तपत्र समूहाने त्यांची मराठवाडा आयकॉन म्हणून निवड केली होती आज पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
शेतकरी नेते अनिल जगताप यांचा मराठवाडा आयकॉन म्हणून सन्मान झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.