Marathwada heavy rainfall loss 2025 : मराठवाडा शेतकऱ्यांसाठी तिप्पट मदतीची मागणी — अनिल जगताप याची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी.

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

धराशिव : Marathwada heavy rainfall loss 2025 : मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना , सांगली महापूरग्रस्तांना केलेल्या 2019 च्या एनडीआरएफच्या तिप्पट नुकसानभरपाई प्रमाणे मदत द्यावी – शेतकरी नेते अनिल जगताप यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

या वर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यात तब्बल 161 टक्के पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या, पिकांचे मोठे नुकसान, पशुधन वाहून गेले, 15 पाझर तलाव फुटले तर सहा जणांचा पुरात मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.

Marathwada heavy rainfall loss 2025

या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 2019 मध्ये सांगली महापुरासाठी दिलेल्या एनडीआरएफच्या तिप्पट नुकसानभरपाईप्रमाणे मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

श्री. जगताप म्हणाले की, “शासनाची सध्याची नुकसानभरपाई देण्याची पद्धत अत्यंत तुटपुंजी आहे. सांगली, कोल्हापूर महापुराच्या वेळी राज्य शासनाने 29 ऑगस्ट 2019 रोजी शासन निर्णय काढून एनडीआरएफच्या निकषाच्या तिप्पट रकमेची मदत दिली होती. त्याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांनाही मदत दिली जावी.”

धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती:


23 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार 2 लाख 34 हजार 977 शेतकऱ्यांना 189 कोटी 60 लाख 67 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही मदत फक्त ऑगस्टमधील अतिवृष्टीसाठी आहे. सप्टेंबर महिन्यातील नुकसानीबाबतचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने शेतकरी वाट पाहत आहेत.

Marathwada heavy rainfall loss 2025

केवायसी पोर्टल बंद, शेतकरी हतबल..

उमरगा आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी 2024 ची 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. त्यापैकी 60 टक्के शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे; मात्र 40 टक्के शेतकरी अद्याप वंचित आहेत. 1 सप्टेंबरपासून केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात अनिल जगताप यांनी शासनाला आवाहन केले आहे की, “तातडीने केवायसी पोर्टल सुरू करून सर्व पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान तरी यावर्षी मिळाले पाहिजे.”