लोहारा / उमरगा (जिल्हा धाराशिव), ऑगस्ट 2025:
2024 मध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या लोहारा व उमरगा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना एकूण ₹86.46 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल दादा जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी यांच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला.

अनुदानाची वैशिष्ट्ये:
- प्रती हेक्टर रु 13600 अनुदान
- कमाल 3 हेक्टर पर्यंत मदत
- DBT प्रणालीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा होणार
- farmer Id नसलेल्या शेतकऱ्यांना KYC नंतर मदत
- अनुदान रक्कम आठवडाभरात खात्यात जमा होणार
महसूल मंडळनिहाय मंजूर मदत (रक्कम व हेक्टर) :
उमरगा तालुक्यातील उमरगा, मुळज, बेडगा, नारंगवाडी, डाळिंब आणि बलसुर या मंडळांमध्ये अनुक्रमे 4,000 ते 8,500 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्या बदल्यात शेतकऱ्यांना एकूण ₹52 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर झाली आहे.
लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी, जेवळी आणि धानोरी मंडळांमध्ये एकूण सुमारे 25,000 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून त्यासाठी सुमारे ₹33 कोटींपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर:
या सत्कार समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. त्यामध्ये प्रमुख उपस्थित:
अजिंक्य बापू पाटील (युवा सेना पदाधिकारी),रजाक आत्तार (माजी नगराध्यक्ष),रणधीर पवार (माजी सभापती), विजय नागणे,सुधाकर पाटील तसेच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी