Nandni Elephant Kolhapur: कोल्हापुरातील हत्ती आता अंबानीच्या वनतारात ,महादेवीची पूर्ण कहाणी!

Picture of इंद्रजीत पवार

इंद्रजीत पवार

Nandni Elephant Kolhapur

जैन धर्मीयांच महत्वाचं तिर्थ पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandni) येथील मठ संपूर्ण जैन धर्मीवासियांच श्रद्धेच स्थान आहे. याच मठात असलेली महादेवी हत्ती (Mahadevi Elephant) संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चेचा विषय बनली आहे.याच महादेवी हत्ती ला आता मुकेश अंबानी यांच्या गुजरात येथील वनतारा प्रकल्पात स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

महादेवीच कोल्हापूर कनेक्शन!

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandni) या गावी जैन धर्मीयांच महत्वाचं तीर्थ पीठ म्हणून ओळखले जाते.शेकडो वर्षांपासून या मठात हत्ती ठेवण्याची परंपरा आहे,कारण जैन धर्मात हत्तीला एक विशेष महत्त्व आहे.याच मठात महादेवी हत्ती (Mahadevi Elephant) वास्तव्यास आहे, महादेवी हत्ती (Mahadevi Elephant) ही या मठात गेली 36 वर्षा पासून वास्तव्य करत आहे.माधवीचे वय सुमारे 40 वर्ष असून ती वयाच्या अवघ्या चार ते पाच वर्षांची असताना तिला या नांदणी (Nandni) गावातील मठात आणले होते.

महादेवीचे वय 40
महादेवीचे वास्तव्य कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील नांदणी (Nandni) या गावी 

आता होणार मुकेश अंबानी यांच्या गुजरात येथील वनतारा स्थलांतरन !

अचानक पणे महादेवी हत्ती (Mahadevi Elephant) दुरवस्था झाली आहे असा दावा करत हा हत्ती मुकेश अंबानी यांच्या गुजरात येथील वनतारात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वनतारा हे खाजगी अभयारण्य असून ते मुकेश अंबानी(Mukesh Anbani ) आणि त्यांचे चिरंजीव अनंत  (Anant Anbani ) अंबानी यांच्या मालकीचे आहे.दोन आठवड्या मधे हा हत्ती वनतारा येथे हलवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.मात्र स्थानिकांनी याला विरोध करत सर्वोच न्यायालयात दाद मागण्याचे ठरविले आहे.