आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तहसीलदार ठरतात आधार । Tahsildar Lohara

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Tahsildar Lohara : नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडात लोहारा तहसीलदार श्री रणजीत सिंह कोळेकर देत आहेत शेतकऱ्यांना नागरिकांना ग्राउंड वर उतरून धीर . शेतकरी नागरिकांमध्ये आदराची भावना.

धाराशिव मध्ये सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबायचे नाव घेत नसून या प्रलयकारी पावसामुळे जिल्ह्यात लोहारा तालुक्यात प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे घरांची पडझड झालेली आहे जमिनी खरवडून गेले आहेत. अशा कठीण प्रसंगी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये जाऊन शेतकरी सर्वसामान्य नागरिकांना धीर देण्याचे काम तालुकाप्रमुख म्हणून तहसीलदार या नात्याने श्री रणजीत सिंह कोळेकर हे चौक पणे पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.


तहसीलदार श्री कोळेकर सर यांनी नैसर्गिक आपत्तीच्या कालखंडात शेतकऱ्यांना सर्वसामान्य माणसाला धीर तर दिलाच परंतु त्यांना आर्थिक मदत कशी होईल यासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. त्यांना एकाच वेळेस तीन पद्धतीचे काम करायचे होते.

गेल्या वर्षी उमरगा लोहारा तालुक्याला ८६ कोटीची अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले आहे त्याच्या याद्या बिनचूकपणे तयार कराव्या लागणार होत्या कारण नंतर शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नये ते काम त्यांनी पूर्ण करून याद्या अपलोड करून मंत्रालयात पाठवले आहेत केवायसी साठी मंजुरी मिळतात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन केवायसी होताच अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Tahsildar Lohara

चालू वर्षी खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आल्याने शेतकऱ्याच्या पिकाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करून जास्तीत जास्त लोकांना कशी मदत मिळवून देता येईल यासाठी देखील त्यांना प्रयत्न करावे लागणार होते ते त्यांनी निश्चितपणाने पार पाडलेले आहेत. सर्वप्रथम जिल्हा प्रशासनाला लोहारा तालुक्याचा अहवाल गेलेला आहे लोहारा हा एकमेव तालुका आहे की जो संपूर्ण तालुका अतिवृष्टी मध्ये बसलेला आहे तहसीलदार श्री कोळेकर सर्व त्यांच्या सर्व सहकार्याने मग ते तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील यांनी घेतलेल्या परिश्रमाचे ते फलित आहे. भविष्यात मिळणारी अतिवृष्टीची मदत तालुक्यातल्या सर्वच शेतकऱ्यांना यामुळे मिळणार आहे.

तहसीलदार श्री रणजीत सिंह कोळेकर ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याच पद्धतीने त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील काम करावी अशी तालुक्यातील नागरिकांची अपेक्षा आहे एखाद्या वेळेस वैयक्तिक काम असू शकते फॅमिली चे काम असू शकते मात्र त्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीला सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना भेट देणे त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी आपले वरिष्ठ श्री रणजितसिंह कोळेकर यांचा आदर्श घेऊन काम करावे अशी अपेक्षा देखील येथील शेतकरी नागरिक व्यक्त करत आहेत.

तालुक्याचा प्रमुख अधिकारी जर चांगला असेल तर त्याच्या रूपान तालुक्याला कशी भरावी मदत मिळते याचा मूर्ती मंद उदाहरण म्हणजे तहसीलदार श्री रणजीत सिंह कोळेकर असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.