(लोहारा) : Terna Dam : निम्न तेरणा प्रकल्प माकणी धरणाचे नियंत्रण करणारे उपविभागीय अभियंता यांचे कार्यालय सध्या लातूर येथे असून ते तातडीने लोहारा येथे स्थलांतरित करावे, अशी ठाम मागणी शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांनी शासनाकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे इशारा देताना सांगितले की, महिनाभरात या संदर्भात निर्णय झाला नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
1989 साली उभारलेले निम्न तेरणा प्रकल्पातील माकणी धरण हे लोहारा तालुका, धाराशिव जिल्ह्यात आहे. धरणाची साठवण क्षमता १२१ दशलक्ष घनमीटर असून धरणावर एक उपसा सिंचन योजना सुरू आहे व दुसरी प्रस्तावित आहे. याच धरणातून प्रवाही कालव्याद्वारे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो, लोकमंगल साखर कारखाना तसेच निलंगा, उमरगा, लोहारा शहरांसह अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत.

श्री. जगताप म्हणाले की, “धरण धाराशिव जिल्ह्यात असताना त्याचे नियंत्रण कार्यालय मात्र लातूर येथे ठेवणे ही शेतकऱ्यांवरील अन्यायकारक बाब आहे. विद्यार्थी धरणग्रस्त प्रमाणपत्रासाठी किंवा शेतकरी गाळपेरा व इतर कामासाठी लोहाऱ्यापासून ६० किमी अंतरावर लातूर येथे चकरा मारतात. त्यामुळे वेळ व पैसा वाया जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी हे कार्यालय त्वरित लोहारा येथे स्थलांतरित करावे.”
त्यांनी पुढे इशारा दिला की, “शासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन करू.