हराळी येथे सांस्कृतिक उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

हराळी : Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : हराळी येथे शिवजयंती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

लोहारा तालुक्यातील हराळी (जि. धाराशिव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस विविध सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सिंहासनाधीश्वर मित्र मंडळ, हराळी यांच्या वतीने करण्यात आले.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

या कार्यक्रमांतर्गत संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धा, लहान मुलांचे नृत्य, पारंपरिक लेझीम सादरीकरण तसेच शिवरायांचा पाळणा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत शिवरायांचा पाळणा अत्यंत भावपूर्ण व सुंदर पद्धतीने सादर केला. या कार्यक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.

या उपक्रमांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हराळी व ज्ञान प्रबोधीनी विद्यालय, हराळी येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी शिवचरित्र, देशभक्ती व सामाजिक विषयांवर प्रभावी विचार मांडले. लहान मुलांच्या नृत्य व लेझीम सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. शिवजयंती केवळ नाचून साजरी करण्यापेक्षा वाचन, विचार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरी करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे कॅप्टन व तंटामुक्त अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी, उप तंटामुक्त अध्यक्ष धनराज सूर्यवंशी, उपसरपंच रवींद्र सूर्यवंशी, समाजसेवक अनिल सूर्यवंशी, तसेच विकास सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे शिक्षक अनिल बिराजदार यांनी विद्यार्थ्यांची उत्कृष्ट तयारी करून घेतली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व यशस्वी झाला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सिंहासनाधीश्वर मित्र मंडळ, हराळी यांच्या प्रयत्नांमुळे शिवजयंती उत्कृष्टरीत्या पार पडली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांनी सर्व सहभागी व उपस्थितांचे आभार मानले.