शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पराभवानंतरही संघर्ष सुरूच! Dharashiv Farmers Crop Insurance

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

मा. ज्ञानराज चौगुले साहेब – शेतकऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयीन लढा देणारा नेता

विधानसभा निवडणुकीत जय-पराजय होत असतात, मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेत्याची खरी ओळख निवडणुकीच्या निकालावरून नव्हे, तर संकटाच्या काळात तो जनतेच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा राहतो यावरून ठरते.

मा. ज्ञानराज चौगुले साहेब हे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून आज धाराशिव जिल्ह्यात ओळख निर्माण करत आहेत.

    Dharashiv Farmers Crop Insurance

2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2020 च्या पीक विम्याचे 227 कोटी रुपये मिळावेत, यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयीन लढा सुरू ठेवला. सत्तेत नसतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे हे कार्य निश्चितच उल्लेखनीय आहे.

खरीप 2020 पीक विमा : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दीर्घ न्यायालयीन लढा

खरीप 2020 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 9 लाख 48 हजार 990 शेतकरी अर्जदारांनी पीक विमा भरला होता. त्या वर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र 24 तासांच्या आत पूर्वसूचना दिली नाही, असा तांत्रिक मुद्दा उपस्थित करून बजाज अलायन्स पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील केवळ 79 हजार शेतकऱ्यांना 56 कोटी रुपयांचे वितरण केले.

हा प्रकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची भूमिका शेतकरी नेते अनिल जगताप यांनी मांडली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती तत्कालीन लोहारा-उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. ज्ञानराज चौगुले साहेब यांना दिली. त्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चौगुले साहेब यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली.

    Dharashiv Farmers Crop Insurance

धाराशिव जिल्ह्यात लोकप्रतिनिधीच्या नावाने दाखल झालेल्या या याचिकेने पीक विम्याच्या प्रश्नाला न्यायालयीन पातळीवर महत्त्वपूर्ण दिशा दिली.

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार रुपये देण्याचे आदेश दिले. या निर्णयानुसार विमा रक्कम जवळपास 600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत होती.

विमा कंपनीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने 200 कोटी रुपये जमा करण्याच्या अटीवर प्रकरण दाखल करून घेतले आणि शेतकऱ्यांना रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर उर्वरित रक्कम मिळावी म्हणून चौगुले साहेब यांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या काळात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीविरोधात महसुली वसुलीची (RRC) कारवाई सुरू केली. या प्रक्रियेतही न्यायालयीन संघर्ष सुरू राहिला.

विविध न्यायालयीन आदेश आणि कारवाईच्या माध्यमातून आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे 376 कोटी रुपये मिळाल्याचे या प्रकरणातील आकडेवारी सांगते.

आणखी 227 कोटींसाठी सर्वोच्च न्यायालयात निर्णायक लढा

छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने 14 नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार जमा असलेली 75 कोटी रुपयांची रक्कम, त्यावरील व्याज मिळून 93 कोटी रुपये आणि राज्य शासनाकडे थकीत असलेला पीक विमा कंपनीचा 134 कोटी रुपयांचा हप्ता, अशी एकूण 227 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश दिले होते.

मात्र या निर्णयाला पीक विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर या प्रकरणात स्थगिती मिळाल्याने शेतकऱ्यांचे 227 कोटी रुपये पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत अडकले.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी आणि न्यायालयीन लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचावा, यासाठी मा. ज्ञानराज चौगुले साहेब यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात ठामपणे बाजू मांडली.

या प्रकरणाचा अंतिम निकाल शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे अपेक्षित आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. विशेष म्हणजे दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील प्रत्येक सुनावणीसाठी श्री ज्ञानराज चौगुले साहेब व अनिल जगताप हे उपस्थित राहून प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असतात.

अनिल जगताप यांचे तांत्रिक सहकार्य आणि शेतकरी हिताची भूमिका

    Dharashiv Farmers Crop Insurance

या संपूर्ण न्यायालयीन लढ्यात शेतकरी नेते अनिल जगताप यांनी पीक विम्याशी संबंधित तांत्रिक माहिती, शेतकऱ्यांच्या अडचणी, विमा प्रक्रियेतील त्रुटी आणि प्रकरणाची पार्श्वभूमी याबाबत सातत्याने सहकार्य केले.

सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण, न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती आणि शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका यामुळे या लढ्याला बळ मिळाले.

सर्वोच्च न्यायालयात मा. ज्ञानराज चौगुले साहेब यांच्या वतीने एडवोकेट अतुल डक बाजू मांडत आहेत. उच्च न्यायालयातील प्रकरणांमध्ये एडवोकेट श्रीकांत वीर आणि एडवोकेट कोळी यांनी सक्षमपणे बाजू सांभाळली. या सर्वांना शेतकरी नेते अनिल जगताप यांनी आवश्यक तांत्रिक माहिती व सहकार्य दिले.

पराभवाने न थांबणारे नेतृत्व!

राजकारणात विजय आणि पराभव हा प्रवासाचा भाग असतो. मात्र निवडणुकीत पराभव झाला म्हणून जनतेच्या प्रश्नांकडे पाठ फिरवायची नसते, ही भूमिका मा. ज्ञानराज चौगुले साहेब यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.

शेतकरी जगला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजेत, या विचारातून ते आजही काम करत आहेत.

त्यामुळे उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघापुरतेच नव्हे, तर धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये चौगुले साहेबांविषयी विश्वास आणि आधाराची भावना निर्माण झाली आहे.

नेतृत्व हे पदाने नाही, तर संकटात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याने सिद्ध होते!

खरीप 2020 च्या पीक विम्याचे उर्वरित 227 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळावेत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा, हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना!