लोहारा : Farmers financial relief : लोहारा उमरगा तालुक्यातील 38 हजार शेतकऱ्यांचे 41 कोटी रुपये चे अतिवृष्टी अनुदान 2024 खात्यावर जमा होण्यास सुरुवात शेतकऱ्यात उत्साह अनिल जगताप यांची माहिती.
खरीप 2024 मध्ये लोहारा उमरगा तालुक्यात अतिवृष्टी झाली होती मात्र सुरुवातीला लोहारा उमरगा तालुक्याचा अतिवृष्टीचा प्रस्ताव नाकारला गेला होता मात्र सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल जगताप यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरल्यानंतर सुधारित प्रशासकीय अहवाल तयार करून लोहारा उमरगा तालुक्यातील 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये मिळण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव दिला गेला.

विभागीय आयताकडून प्रस्ताव मंत्रालयात न गेल्यामुळे एक वर्षभर हे अनुदान रखडले होते यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी धरणे आंदोलन रस्ता रोको केल्यानंतर अखेर राज्य शासनाने एक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सहा 2025 ला उमरगा लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना 79 हजार 880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये मंजूर केले होते. सुरुवातीच्या कालखंडात त्यातील जवळपास 50 हजार शेतकऱ्याचे अनुदान वितरित झाले होते मात्र केवायसी करून पाच महिने उलटून देखील अद्याप पर्यंत 38 हजार शेतकऱ्यांचे 41 कोटी रुपयांची अनुदान रखडले होते.
मी बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी प्रशासन आणि मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला होता तो अखेर काही पासून रखडलेल्या 38 हजार शेतकऱ्यांचे 41 कोटी रुपये अनुदान वितरण होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अनिल जगताप यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याने उत्साह दिसून येत आहे.

अतिवृष्टी अनुदान 2024 मंजूर असलेल्या 79 हजार आणि 80 शेतकऱ्यांना मिळेपर्यंत आपला प्रयत्न व संघर्ष सुरू राहणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिली.


