खरीप पीक विमा 2025 : वगळलेल्या 14 महसूल मंडळांसाठी उद्या लोहारा येथे धरणे आंदोलन | Kharif Crop Insurance 2025

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Kharif Crop Insurance 2025 : खरीप पिक विमा 2025 वगळलेल्या महसूल मंडळासाठी उद्या धरणे आंदोलन..

आमदार कैलास पाटील, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, विविध सामाजिक संस्था व 76 ग्रामपंचायतीचा पत्राद्वारे पाठिंबा.
खरीप 2025 चा पिक विमा नुकसान भरपाई देताना आयसीआयसी लोम्बार्ड या पिक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील 69 महसूल मंडळापैकी केवळ 43 मंडळांना स्पीकर नुकसान भरपाई दिली उर्वरित 14 महसूल मंडळे हे एक नुकसान भरपाई पासून वंचित ठेवले आहे त्याविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली उद्या लोहारा तहसील कार्यालयासमोर अकरा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात येणार आहे.

Kharif Crop Insurance 2025

गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला सरासरीच्या 181 टक्के इतका पाऊस झाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले राज्य शासनाने शासन निर्णय काढून मदत दिली मात्र हे विमा कंपनीला मान्य नाही. त्यांनी जिल्ह्यातील एकूण 14 महसूल मंडळ वगळले असून त्याचा सर्वाधिक फटका लोहारा परंडा या दोन तालुक्याला बसला आहे.
पिक विमा योजनेत गेल्या वर्षीपासून पीक कापणी प्रयोगाद्वारे 50 टक्के तर तांत्रिक उत्पादनावर आधारित 50 टक्के पीक नुकसान भरपाई दिली जाते. सॅटॅलाइट द्वारे जे छायाचित्र घेतलं जातं त्याचं तांत्रिक विश्लेषण करून 50% नुकसान भरपाई दिली जाते मात्र त्यात अगदी मनमानी केल्यामुळे तसेच चुकीची आकडेवारी व सरासरी आकडेवारी दिल्यामुळे 14 महसूल मंडळातील उत्पादनात प्रचंड वाढ दाखवण्यात आली परिणामी ही महसूल मंडळी एक नुकसान भरपाई पासून वंचित राहिली आहेत.

Kharif Crop Insurance 2025


यासंदर्भात सुरुवातीला शेतकरी नेते अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केल्यानंतर परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे अहवाल दिला आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तो अहवाल राज्य शासनाला पाठवला आहे.
पिक विमा अभ्यासक अनिल जगताप व लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील यांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या असून त्यावर त्वरित निर्णय अपेक्षित आहे तसे झाल्यास 14 महसूल मंडळाला न्याय मिळणार आहे.

शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या उद्याच्या लोहारा तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाला लोकप्रिय आमदार कैलास दादा पाटील संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध सामाजिक संस्था व 76 गावच्या ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे एकमताने पाठिंबा दिला आहे.

उद्याच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला न्याय हक्क मिळवून घ्यावा असे आवाहन शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केले आहे.