लोहारा : Anil Jagtap campaign : कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात पार्वती मल्टीस्टेटचे शेकडो सभासद करणार अनिल जगताप यांचा प्रचार.. महत्त्वपूर्ण बैठकीत सभासदांचा निर्णय.
पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या सभासदासाठी तारणहार ठरलेल्या अनिल जगताप यांच्या ऋणातून व्यक्त होण्यासाठी शेकडो खातेदारांनी कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात उभ्या असलेल्या अनिल जगताप यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेत एका खास बैठकीद्वारे आर्थिक मदत करण्याचा निर्णय देखील घेतला असल्याचे बँकेच्या सभासदांनी अवगत केले .

गेल्या दोन-तीन वर्षापासून सभासदाचे कोट्यावधी कोटी रुपये व व्याज पार्वती मल्टीस्टेट बँकेत अडकून पडले होते. बँकेच्या सर्व खातेदारांनी विनंती केल्यानंतर अनिल जगताप यांनी त्यात लक्ष घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन तसेच छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यात आता 6 फेब्रुवारीला अंतिम निकाल देणार असल्याचे एका लेखी आदेशाद्वारे उच्च न्यायालयाने घोषित केले आहे. त्यामुळे आपले बुडालेले पैसे मिळणार याचा आनंद पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या सभासदांना झाला.

यात सभासदांना धीर देऊन त्यांचे पैसे परत मिळवून देण्याच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या अनिल जगताप यांचा कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात प्रचार करण्याचे पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदारांनी ठरवले आहे तसेच जगताप यांना ते आर्थिक मदत देखील करणार आहेत.
पार्वती मल्टीस्टेट बँकेची पार्श्वभूमी..
2015 ला पार्वती मल्टीस्टेट बँकेची पुणे येथे स्थापना झाली त्यानंतर बँकेने लोहारा उमरगा तालुक्या त सास्तुर डाळिंब तुरोरी खजगी एनेगुरु या ठिकाणी शाखा उघडल्या ज्यादा व्याजदर देण्याचे अमित दाखवून अनेक खातेदाराचे बँकेत कोठ्यावधी रुपये जमा करून घेतले मात्र मुदत संपल्यावर ही पैसे न दिल्याने दोन-तीन वर्षापासून खातेदार हवलदील झाले होते. आयुष्यात अत्यंत कष्टाने कलेल कमाई केलेली पैसे बुडीत जाणारी या विचाराने निराश होऊन अत्यंत दुःखी जीवन जगत होते. काही खातेदारांनी आष्टामोड येथे बैठका घेत आणि जगताप यांना लक्ष देण्याची विनंती केली.
रस्त्यावरच्या लढाईसोबत न्यायालयीन लढाई करण्याचे देखील ठरवले. जिल्हाधिकारी कार्यालय समोर 7 ऑगस्ट रोजी धरणेआंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले व शेवटी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली अवघ्या पाचच महिन्यात सहा फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल लागत असल्याने खातेदारांनी समाधान व्यक्त करीत ज्यांनी कठीण काळात साथ दिली त्या श्री अनिल जगताप यांचा कानेगाव मतदार संघात पूर्ण ताकतीने प्रचार करण्याचे ठरविले आहे.

श्री. संजय संजय मनाळे बँकेचे खातेदार यांची प्रतिक्रिया.
अत्यंत कष्टाने जमा केलेली रक्कम पार्वती मल्टीस्टेटमध्ये ठेवली होती मुदत संपूनही बँक पैसे परत देत नव्हते केवळ आणि केवळ रूपाने आलेल्या अनिल जगताप यांनीच ती मदत मिळवून देण्याच्या प्रक्रियेत आम्हाला मदत केली मानसिक आधार केला त्या ऋणातून उतराई होण्यासाठी कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात अनिल जगताप यांचा प्रचार करणार आहोत.
बेबी सूर्यवंशी पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदार यांची प्रतिक्रिया.
अत्यंत काटकसरीचे जीवन जगून जमा केलेली रक्कम पार्वती मल्टीस्टेट बँकेत ठेवली होती. मुदत संपून पार्वती मल्टीस्टेट बँक पैसे परत देत नव्हती तसेच पैसे मागितल्यावर अपमान जनक वक्तव्य बँकेकडून येत होती त्यामुळे मानसिक आधार तुटला होता. अनिल जगताप यांच्या रूपाने देव माणूसच भेटला. अशी माणसं समाजात टिकून राहिली पाहिजे यासाठी त्यांचा प्रचार करण्याचे ठरविले असून कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातून निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करणार आहोत.


