कानेगाव : Farmer Leader Anil Jagtap : पक्षाने नाकारले मात्र जनतेने स्वीकारले अशीच काहीशी अवस्था कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात शेतकरी नेते अनिल जगताप यांची झाली असल्याचे दिसून येत आहे.
सध्या धाराशिव जिल्ह्यात जिल्हा, परिषद पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून अनेक जण गुडघ्याला बाशिंग लावून निवडणुकीची तयारी करत आहेत. मात्र जनतेच्या कसोटीला उतरणारे खूपच कमी कार्यकर्ते आहेत त्यामुळे आता निवडणुकीत त्यांचा खरा कस लागणार आहे. पाच वर्ष गायब असलेले काही माणसं आता या पाच महिन्यांमध्ये सक्रिय होऊन निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत मात्र अशा माणसांना जनता धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष यांनी 40 वर्ष काम केलेल्या अनिल जगताप यांना एबी फॉर्म दिला नाही पक्षीय राजकारण करून जनतेच्या सेवेत सतत सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्याला संपवण्याचा डाव काही पक्षातील कार्यकर्त्यांनी आखला त्याचा परिणाम अनिल जगताप यांना त्यांच्या सौ निता अनिल जगताप यांचा अपक्ष उमेदवारी फॉर्म भरावा लागला.

अपक्ष उमेदवारी फॉर्म भरल्यानंतर शेतकरी नेते अनिल जगताप यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन शेतकरी, सर्वसामान्य नागरिक ,महिला, अल्पसंख्यांक मागासवर्गीय बांधव यांच्याशी थेट संवाद साधून अपक्ष फॉर्म भरला असून फॉर्म कायम ठेवावा की काढून घ्यावा अशी थेट विचारणा गावागावात केली मात्र प्रत्येक गावातील नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत फॉर्म काढून घेऊ नका हीच ती योग्य वेळ आहे योग्य माणसाला निवडून देण्याची अशी ग्वाही देत फॉर्म काढून न घेण्याचा आदेशच दिला.

काही शेतकऱ्यांनी तर अक्षरशा तुम्ही जर फॉर्म काढून घेतला तर आम्ही कुणालाही मतदान न करता नोटाला मतदान करू मात्र कुठल्याही परिस्थितीत राजकीय पक्षांच्या पाठीमागे जाणार नाही असे स्पष्ट पणाने सांगितले पक्षाने नाकारले मात्र कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील जनतेने स्वीकारले अशी अवस्था शेतकरी नेते अनिल जगताप यांची झाली असून त्यांनीही शेतकरी बांधव सर्वसामान्य नागरिक महिला अल्पसंख्याक मागासवर्गीय यांच्या जनादाराचा आदेशाचा सन्मान करत उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे सांगितले.



