खरीप 2025 पीक विमा : धाराशिवच्या 14 महसूल मंडळांसाठी लोहाऱ्यात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, 170 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी | Kharif 2025 Crop Insurance

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Kharif 2025 Crop Insurance : खरीप 2025 पिक विमा नुकसान भरपाईतून वगळलेल्या जिल्ह्यातील 14 महसूल मंडळांना पिक विमा मिळवून देण्यासाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर आज शेतकऱ्याचे धरणे आंदोलन संपन्न झाले.

Kharif 2025 Crop Insurance


धाराशिव जिल्ह्यातील एकूण सत्तावन महसूल मंडळापैकी केवळ 43 महसूल मंडळाला 2025 चा पिक विमा दिला असून धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळांना पिक विमा नुकसान भरपाईतून एक रुपयाही मिळणार नाही या जाचक निर्णयाविरुद्ध शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली 14 महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

Kharif 2025 Crop Insurance

आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती तरी देखील पडत्या पावसात शेतकरी बांधवांनी धरणे आंदोलन केले हे विशेष राज्य शासनाने गेल्या वर्षी पासून नवीन पिक विमा योजना आणली असून पीक कापणी कापणी प्रयोगाद्वारे 50 टक्के रक्कम व सॅटॅलाइट इमेज द्वारे अर्थात तांत्रिक उत्पादना आधारे 50% रक्कम मिळून पीक नुकसान भरपाई दिली जात आहे त्यात तांत्रिक उत्पादनाच्या आकडेवारी मध्ये घोळ घालून पिक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील 14 महसूल मंडळातील 167 गावातील शेतकऱ्यांना हक्काच्या 170 कोटी रुपये रकमेपासून वंचित ठेवले आहे .

Kharif 2025 Crop Insurance

परंडा तालुक्यातील सहा लोहारा तालुक्यातील तीन धाराशिव तालुक्यातील तीन वाशी तालुक्यातील एक व कळम तालुक्यातील एक अशा 14 महसूल मंडळाचा समावेश आहे त्याविरुद्ध शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांनी वज्रमुठ केली असून आता आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Kharif 2025 Crop Insurance

या धरणे आंदोलन ना दरम्यान बोलताना शेतकरी नेते अनिल जगताप म्हणाले की चुकीची आकडेवारी देऊन तांत्रिक उत्पादनाचा घोळ घालून शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यापासून वंचित ठेवले आहे त्याविरुद्ध मी व आमदार कैलास पाटील आम्ही दोघांनी राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे याचिका दाखल केली.

Kharif 2025 Crop Insurance

असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानी संदर्भात परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी अहवाल दिला असून राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. पुढील आठवड्यात बैठक होऊन निर्णय अपेक्षित आहे अन्यथा यापुढे शेतकरी बांधवाला सोबत घेऊन रस्ता रोको, मोर्चा, आमरण उपोषण यासारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल.

Kharif 2025 Crop Insurance

खरं म्हणजे वेळीच लक्ष घालून लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं अपेक्षित असतं मात्र तसं घडलं नाही आता मंत्र्यांना निवेदन देऊन काय होणार अशी जनभावना देखील भाषणादरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केली यावेळेस शेतकरी तानाजी पाटील, महेश गोरे, रोहित कारभारी, बालाजी पवार इत्यादींनी व्यक्त केली या धरणे आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी पावसात देखील उपस्थिती दर्शवली हे विशेष.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लोहारा तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.