भीषण दुष्काळी परिस्थितीच्या धरतीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दुष्काळी पाहणी पथकाचा लोहारा तालुक्यात दौरा | 42 Days Rain Break

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा :42 Days Rain Break : यावर्षी पावसाने ओढ दिल्याने धाराशिव जिल्ह्यात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे जनावराच्या चाऱ्यांबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर झालेला आहे त्यामुळे शेतकरी हातबल झालेला दिसत आहे. क्या धरतीवर शासकीय मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी दुष्काळी पाहणी पथकाने लोहारा तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.

42 Days Rain Break

यावर्षी सुरुवातीला थोडासा पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बियाणे कीटकनाशके खते यावर अमाप खर्च करून पेरणी केली आली होती पिके ही कशीबशी आली होती मात्र त्यानंतर पावसाने प्रचंड असं ओढ दिली असून सरासरीच्या सर्वात कमी पाऊस लोहारा तालुक्यात झाला आहे गेल्या 42 दिवसाचा पावसाचा खंड पडल्याने पिके वाळून गेली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाप्रमाणे 33% पेक्षा जास्तीचे नुकसान व्हावे लागते तरच दुष्काळी मदत शेतकऱ्यांना मिळते.

42 Days Rain Break


जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकप्रतिनिधी शेतकरी यांनी तक्रारी केल्यानंतर 3 सप्टेंबर रोजी पत्र काढून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकारी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आयआयटी मुंबईचे अधिकारी कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे अधिकारी शेतकरी यांची एक समिती गठीत केली होती या समितीने प्रत्येक तालुक्यात जाऊन पाहणी केल्याचे समजते आज हे पाहणी पथक लोहारा तालुक्यात आले होते.

42 Days Rain Break

अनिल जगताप यांची प्रतिक्रिया..

42 Days Rain Break

संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात भीषण अशी दुष्काळी परिस्थिती असून जनावराच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच यावर्षी शेतकऱ्यांना पिक विमा देखील भरपूर प्रमाणात मिळाला पाहिजे तरच शेतकरी जिवंत राहील. पीक नुकसान भरपाई देताना हेक्टरची मर्यादा व पैशात देखील वाढ करणे गरजेचे आहे.

शासन याची गांभीर्याने नोंद घेऊन शेतकऱ्याला मदत करेल.

मुक्ती संग्राम दिन केवळ उत्सवापुरता नको; मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मराठवाड्याला ठोस विकासाचा ‘निर्णय’ द्या!धाराशिवसह मराठवाड्याच्या ज्वलंत प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची अनिल जगताप यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी | Marathwada Liberation Day