सहानुभूतीची लाट: कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अनिल जगताप आघाडीवर | Anil Jagtap Farmer Leader

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

कानेगाव : Anil Jagtap Farmer Leader : कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार सौ.नीता अनिल जगताप यांच्यासाठी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी झंजावती दौऱ्याला प्रारंभ केला असून उंडरगाव मध्ये शेतकरी व नागरिकाच्या गाठीभेटी घेतल्या.
महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर लढवय्या शेतकरी नेते अनिल जगताप यांनी अखेर अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.

Anil Jagtap Farmer Leader

तो बराच अंशी खरा ठरत असल्याचे दिसून येत असून त्यांच्या विषयी मतदारसंघात सहानुभूतीची प्रचंड
लाट निर्माण झाली असल्याने कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघातील त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

धाराशिव जिल्ह्याला लोहारा उमरगा तालुक्याला शेकडो कोटीचा पिक विमा व अतिवृष्टी मिळवून देणाऱ्या लढवय्या नेता अनिल जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एबी फॉर्म दिलाच नाही. गेल्या 40 वर्षापासून एक निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करून देखील चार दिवसात पक्षाचे सूत्र हातात घेतलेल्या माणसांनी हे तो पुरस्कार एबी फॉर्म दिला गेला नाही त्यासाठी त्यांनी वाटाघाटी मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटलेला आहे असे सांगितले.

मात्र ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार उभा आहे त्याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेनेचा पंचायत समितीचा उमेदवार उभा आहे मग कसलीही महाविकास आघाडी. अनिल जगताप यांच्यावर झालेल्या अन्यायाने संपूर्ण लोहारा उमरगा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्याविषयी प्रचंड सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म न घेता शेवटी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीसाठी घेणे सुरू केले आहे त्यांना अधिकृत चिन्ह 27 तारखेला मिळणार आहे तेव्हापासून ते घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Anil Jagtap Farmer Leader

सन 2024 मध्ये अगदी बुडालेले 80 हजार शेतकऱ्याचे 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपये चे अतिवृष्टी अनुदान आणि जगताप यांनी मिळवून दिले होते तसेच ज्या ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांना अडचणी येतील त्या ते ठिकाणी आंदोलन उभे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे.

कानेगाव जिल्हा परिषद मतदार संघात एकूण 23 हजार 544 इतके मतदान असून या मतदारसंघात अनिल जगताप यांनी शेकडो कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिलेले आहेत निलेश लंके यांचा शेतकरी मेळावा घेतला तसेच सुप्रिया शेतकरी संवाद दौऱ्याच्या माध्यमातून राजकीय वातावरण निर्माण केले होते राजकारणापेक्षा त्यांचा समाजकारणावर भर असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्याकडे आकर्षित झालेला आहे.

मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांना भक्कम पाठिंबा मिळत असून निश्चितपणाने हाच पाठिंबा विजयापर्यंत जाणार असल्याचे दिसून येत आहे.