धाराशिव : Dharashiv Farmers Protest : खरीप 2020 व 25 ची पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासह उद्या 5 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा वाजता धरणे आंदोलन अनिल जगताप यांची माहिती.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उच्च व सर्वोच्च न्यायालयाने खरीप 2020 संदर्भातील पीक विमा नुकसान भरपाई पोटी प्रति हेक्टर 18000 याप्रमाणे 639 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते. त्यातील 376 कोटीचे वाटप झाले असून उर्वरित रक्कम उच्च न्यायालयाचा निकाल लागून ही आत्तापर्यंत शेतकऱ्यांना वाटप केली गेलेली नाही यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने 94 कोटी रुपयाला स्थगिती दिली आहे मात्र 134 कोटी रुपयाला कुठेही स्थगिती दिली नाही पैसे देण्यासंदर्भातील शासन निर्णय 11 फेब्रुवारी रोजी निघाला आहे मात्र अद्याप पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक रुपया देखील दिला गेलेला नाही.
खरीप 2025 मध्ये राज्य शासनाने नवीन पिक विमा योजना राबवली त्यात अगदी पेरणी पासून कापणी पर्यंत पीक कापणी प्रयोगा आधारेच नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे यापूर्वी नुकसान भरपाई देण्याचे चार ट्रिगर राज्य शासनाने बंद केले होते त्याचा प्रचंड मोठा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला. धाराशिव जिल्ह्यात एकूण 504 पीक कापणी प्रयोग झाले असून पिक विमा कंपनीने 217 पीक कापणी प्रयोगावर जिल्हास्तरीय सुकाणू समितीकडे आक्षेप नोंदवले होते त्यापैकी दोनशे पीक कापणी प्रयोगासंदर्भातील अक्षय फेटाळले गेले आहेत उर्वरित 17 प्रयोगासाठी कंपनीने राज्यस्तरीय सुकाणू समितीकडे तक्रार दाखल केली होती त्यावरती ही सुनावणी झाली आहे मात्र अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या पदरात एक रुपया देखील पडला नाही.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात चालू वर्षाच्या पिक विमा नुकसान भरपाई रक्कम देण्यास सुरुवात झालेली आहे. मराठवाड्यातल्या नांदेड सारख्या जिल्ह्याला देखील 813 कोटी रुपये मंजूर होऊन त्याचे बऱ्यापैकी वितरण झालेले आहे मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाही मिळाला नाही शेतकरी अडचणीत असून ही त्यांच्या हक्काचे पीक नुकसान भरपाई देण्याविषयी वेळोवेळी पिक विमा कंपनी ,शासन ,प्रशासन यांच्याकडे अर्ज विनंती करून काही उपयोग होत नाही त्यामुळे उद्या पीक विमा कंपनी शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व बळीराजाला आर्थिक दिलासा मिळावा याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्यासमोर पाच मे रोजी अर्थात उद्या सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केले आहे.


