धाराशिव पीक विम्यासाठी उमरग्यात रस्ता रोको आंदोलन | Anil Jagtap | Pravin Swami

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

नारंगवाडी : Anil Jagtap | Pravin Swami : नारंगवाडी ता. उमरगा येथील रस्ता रोको आंदोलनात शेतकरी नेते अनिल जगताप व लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी यांची घोषणा ..पीक विम्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करणार.

Anil Jagtap | Pravin Swami

खरीप 2020 मधील स्थगिती नसलेले 134 कोटी रुपये तसेच खरीप 2020 चा संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा प्रलंबित पिक विमा व एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा लागू करावी यासाठी शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाच मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर आज 14 मे रोजी नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रस्ता रोको आंदोलनामुळे व रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती या आंदोलनासाठी लोकप्रिय आमदार श्री प्रवीण स्वामी सर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद पवार तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार शिवसेनेचे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजयकुमार नागणे श्री अमोल चव्हाण राहुल डोणगाव एडवोकेट विकास पाटील व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Anil Jagtap | Pravin Swami


धरणे आंदोलन करून रक्त रोको आंदोलन करूनही शासनाला जाग येत नसून दाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला त्यांच्या हक्काच्या पिक विमा पासून वंचित ठेवण्यात आल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेला आहे शेतकऱ्याची बाजू घेत आणि जगताप यांनी आंदोलनाचा धडाका उडवून दिलेला आहे. आणखी दहा दिवसात विमा नुकसान भरपाई नाही मिळाल्यास धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी सर्व शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिला.

Anil Jagtap | Pravin Swami

खरीप 2020 मधील 134 कोटी रुपयाला कुठेही स्थगिती नसताना उच्च न्यायालयाचा निकाल लागून सहा महिने झाल्यानंतर देखील अद्यापही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप केले जात नाही तसेच पीक कापणी प्रयोगावर आक्षेप घेऊन खरीप 2020 चा पिक विमा नुकसान भरपाई देण्यापासून कशी लांबवली जाईल याच पद्धतीचा विचार पिक विमा कंपनी करत असून महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप झालेले असताना देखील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याला मात्र अद्याप पर्यंत एक दमडीही दिलेली नाही. तसेच एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा लागू करावी यासाठी देखील हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आजच्या रस्ता रोको आंदोलनामध्ये लोहारा उमरगा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री प्रवीण स्वामी सर यांनी स्वतः सहभाग घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीने पीक कापणी प्रयोग घेतलेले कंपनीचे अक्षय फेटाळून लावले आहे मात्र कंपनी पुढे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे सध्या कुठलीही स्थगिती नसल्याने तातडीने पिक विमा कंपनीने शेतकऱ्याला पैसे वाटप करावी अशी आता सर्व शेतकरी बांधवांची भावना आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील काही मंडळांना एक नुकसान भरपाईतून वगळले असल्याची चर्चा देखील आता रंगत आहे प्रचंड अतिवृष्टी होऊन आर्थिक नुकसान झाल्यावर देखील पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही दुर्दैवी बाब आहे.

Anil Jagtap | Pravin Swami

विमा कंपनी, राज्य शासन यांनी वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलनाचा भडका उडल्या शिवाय राहणार नाही अशी आता शेतकरी वर्गामध्ये चर्चा रंगत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते अनिल जगताप प लोकरी आमदार प्रवीण स्वामी सर हे रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे त्याबद्दल शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे.