धाराशिव : Dharashiv Farmers Crop Insurance : खरीप 2025 पिक विमा नुकसान भरपाई न मिळाल्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात वितरण सुरू तर काही जिल्ह्यात पूर्ण.खरीप 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा भरून आपली पिके संरक्षित केली होती त्यासाठी त्यांनी एकूण चार लाख 93 हजार अर्जाद्वारे पिक विमा भरला होता आयसीआयसी लोम्बार्ड या कंपनीला शेतकरी केंद्र व राज्याचा हिस्सा मिळून 130 कोटी रुपयांचा हप्ता गेलेला आहे.

धाराशिव जिल्ह्यात प्रचंड अशी अतिवृष्टी झाली सरासरीच्या 161 टक्के इतका पाऊस पडला प्रचंड प्रमाणामध्ये शेती पिकाचे नुकसान झाले काही तालुक्यात तर अगदी जमिनी टीकासहित खरवडून गेल्या मात्र अद्याप पर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात पीक विमा कंपनीकडून पीक नुकसान भरपाई पोटी दमडीही पडलेली नाही. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात पीक नुकसान भरपाई मिळाला सुरुवात झाली असून मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एकूण 85 महसूल मंडळाला ेक्टरी 25 ते 37 हजार रुपये पर्यंत 813 कोटी रुपये चे वितरण 21 एप्रिल पासूनच सुरू झाले आहे ते आता पूर्णत्वाकडे जात आहे . मग धाराशिव जिल्ह्यात प्रचंड नुकसान भरपाई होऊ नये शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
८०. /११० चा फॉर्मुला आणि पिक विमा कंपनी न्यायालयीन प्रक्रियेत
सध्या राज्य शासनाने पिक विमा नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात ऐंशी 110 चा फॉर्म्युला अवलंबला आहे त्यामुळे जिल्ह्यात कितीही नुकसान झाले तरी जमा झालेल्या मूळ रकमेच्या 110% एवढीच बेक नुकसान भरपाई कंपनी देते उर्वरित पैसे राज्य शासनाला द्यावे लागतात चालू वर्षी 130 कोटी रुपये कंपनीकडे जमा झाले आहेत याचा अर्थ आणखी 13 कोटी असे एकूण मिळून 143 कोटी रुपये कंपनी देणार आहे उर्वरित रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार आहे धाराशिव जिल्ह्याची एकूण पीक नुकसान भरपाई ची आकडेमोड जवळपास 6 00 कोटीच्या आसपास असल्याचे समजते.

कंपनीला काहीच फायदा होणार नाही उलट 13 कोटी रुपये जास्तीचे द्यावे लागतील यासाठी कंपनीने पीक कापणी प्रयोगातील त्रुटीचा आधार घेत न्यायालयीन प्रक्रिया अवलंबली असून वेळ काढून पणा करत आहे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करून ही कंपनीच्या हाती काही लागले नाही त्यामुळे स्वाभाविकपणानं कंपनी उच्च न्यायालयात ,सर्वोच्च न्यायालयात जायला देखील मागेपुढे पाहणार नाही त्यामुळे पिक विमा मिळण्यास किती वेळ लागेल हे कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही.
चालू वर्षी राज्यशास्त्रने पीक विमा योजनेत अमोघलाग्र असे बदल करून पीक नुकसान भरपाई देण्याच्या चार ट्रिगरंपैकी तीन ट्रिगर बंद केले केवळ कापणी प्रयोगा आधारेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे या अगोदर प्रमाणे तीन ट्रिगर सुरू असते तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रचंड अशी मदत यापूर्वीच मिळाली असती.
लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्याचे लक्ष घालण्यासाठी अनिल जगताप यांना लक्ष घालण्यासाठी साकडे..
गेल्या चार ते पाच वर्षात सातत्याने शासन दरबारी तसेच न्यायालयीन प्रक्रिया सक्षम पणाने राबवून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपये मिळवून देणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांना शेतकऱ्यांनी साकडे घातले असून पिक विमा मिळवून देण्यासंदर्भात लक्ष द्यावे अशी त्यांना विनंती केली आहे तालुक्यातील कानेगाव मागणी होळी जेवळी वडगाव केसर जवळगा नाईचाकूर आरणी इत्यादी गावातील शेतकऱ्यांनी त्यांना साखळी घालून लक्ष देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी महाराष्ट्रात सर्वप्रथम आणि सर्वात जास्त पिक विमा धाराशिव जिल्ह्याला मिळत होता मात्र यावर्षी अद्याप पर्यंत एक दमडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही.एकीकडे नुकसान भरपाई झाल्याचा शासन निर्णय झाला असून त्याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळाली आहे मात्र कंपनी हे मान्य करायला तयार नाही.

उद्या जिल्हाधिकारी यांची, अनिल जगताप भेट घेऊन सर्व परिस्थिती अवगत करून आंदोलन व न्यायालयीन लढाईची संपूर्ण माहिती जिल्हाधिकारी यांना देणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कराव्याच्या आंदोलनाची उद्या तारीख जाहीर करणार आहेत तसेच न्यायालयीन प्रक्रियेचाही मार्ग अवलंबून आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात थोडी खुशी थोडा गम आहे.


